संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे कोणी शिवले?
स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांची क्रूरपणे हत्या करून पापी आरंग्याने त्यांच्या शरीराचे तुकडे भीमा-इंद्रायणी नदीच्या काठावर फेकून दीले होते.
शंभूराजांच्या हत्येची ही बातमी नदी काठावर असलेल्या वढू गावातील काही मोजक्याच लोकांना माहीत होती. तसेच निर्दयी औरंगजेबाने हुकुम दिला होता की,’जो कोणी शंभूराजांच्या तुकड्यांना हात लावेल त्याचे शीर कापण्यात येईल.’ त्यामुळे वढू गावामध्ये भयानक भीती व शांतता पसरलेली होती.
या गोष्टीची काहीही कल्पना नसलेली जनाबाई नावाची एक श्री नदीकाठावर कपडे धुण्यासाठी आली होती. तिने कपडे धुण्यासाठी पाण्यात हात घातला असता, तीच्या हाताला शंभूराजांच्या देहाच्या मांसाचा तुकडा लागला. जेव्हा जनाबाईला समजले की, ‘हा मांसाचा तुकडा शंभूराजाचा आहे’, तिच्या डोळ्यातून अश्रू ढसाढसा गळू लागले.
तिला कशाचेच भान राहिले नाही.व ती ते कपडे तिथेच टाकून दामाजी पाटलाच्या वाड्यात निघून गेली. तिने हा सर्व प्रकार पाटलाच्या बायकोला म्हणजे राधाई पाटलीनीला सांगितला. दोघींचे हृदय धडधड व्हायला लागले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या लेकराचे हे झालेले हाल पाहून त्या खूप संतापल्या. त्यांनी लगेच ही खबर संपूर्ण गावात पसरवली. व सगळा गाव वाड्यात जमा झाला.
त्यामध्ये गोरखनाथ बुवा, गोविंद महार व इतर गावकरी होते.कोरेगावला गेलेले दामाजी पाटील पण आले. या भयानक परिस्तिथी मध्ये गावाने पुढे काय करायचे त्याची मसलत सुरू झाली.
गोरखनाथ बुवा म्हणाले की,”आपल्या राज्याच्या लेकराच रक्तमांस आपल्या गावच्या शीवेच्या बाजूला पडाव आणि आपण गप्प बसुन रहाव हे आपल्याला शोभत नाही.”
स्वराज्याचे आपल्या मुलखावर, आपल्या गावावर
खुप उपकार आहेत. त्यामूळे पापी औरंगजेबाच्या फर्मानाला झुगारून आपण आपल्या राजांच्या देहाचे तुकडे गोळा करून त्याचे दहन करु.
परतू गावचे प्रमुख दामाजी पाटील या गोष्टीसाठी तयार नव्हते. शंभूराजांच्या देहाला हात लावणे म्हणजे औरंग्याकडून गावाचे नुकसान करून घेणे.
परंतु राधाई पाटलीन म्हणाली की,’आम्ही आमच्या स्वराज्याच्या छत्रपतीना असे नदी काठावर सोडू शकत नाही.’
“आपल्या पूर्वजांनी गेल्या जन्मात खूप मोठे काम केले असेल म्हणूनच छत्रपती शिवाजी राजाचा बाळ आपल्या गावाच्या मांडीवर झोपायला आला.”राधाई पाटलीनीच्या या शब्दांनी जनाबाई व गोविंद महार यांचे रक्त पेटले.
गोविंद महार म्हणाले,’आम्ही काय हातात बांगड्या भरलेल्या नाहीत.प्राण गेला तरी चालेल पण राजांसाठी, स्वराज्यासाठी इतके तरी करूच.व ते तिघेच नदीकडे जाऊ लागले.त्यांच्या पाठोपाठ गावातील बायकामुले पण सामील झाली.
गोरखनाथ बुवा पण सामील झाले.अन हळूहळू सर्व गाव त्यांना सामील झाला.व ते रात्रीच्या अंधारात ६२ जण नदीकाठावर गुपचूपपणे गेले.
औरंगजेबाच्या छावणीवर नाचगाणी, मौजमज्या चाललेली होते.त्याचा फायदा त्यांनी घेतला.सर्व जण शंभूराजांचे इकडे तिकडे पडलेले अवयव गोळा करत होते. सर्व देह व तुकडे एकत्र झाला.व सर्व लोक गुपचूपपणे गावात आले.
गावात आल्यानंतर ते तुकडे शिवले गेले.कुणी शिर्के घराण्यातील व्यक्तीने राजांचे तुकडे शिवले.मग प्रश्न उत्पन्न झाला की देहाचे दहन कोठे करायचे?तर् त्यासाठी पुन्हा गोविंद महार यांनी स्वत:च्या जमिनीवर राजांच्या देहाचे दहन करायला खुल्या दिलाने परवानगी दिली.व तेथेच या ६२ जणांनी राजांच्या देहाला अग्नी दिला.
हे गोविंद महार म्हणजे रायप्पा महार यांचे मावसभाऊ!
या ६२ शूर लोकांचे, जनाबाईचे, राधाई पाटलीनीचे, गोविंद महार यांचे उपकार संपूर्ण महाराष्ट्र केव्हाच विसरू शकणार नाही.
“मारणारा मेला, पण मेलेला अमर झाला”
जय जिजाऊ!जय शिवराय! जय शंभूराजे!