बिडी उत्पादनावरील छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव हटवा

शिवधर्म फाउंडेशनचे पुरंदर पायथ्याला उपोषण

महाराष्ट्रात गेली आठ दशकांपासून शिवाजी बिडीचे उत्पादन होत आहे. या बिडीचे नाव बदलण्यासाठी १९७५ मध्ये आंदोलनझाले होते. त्या वेळी या बिडीचे नाव बदलून संभाजी बिडी ठेवण्यात आले.

संभाजी महाराज यांचेदेखील नाव या बिडीला देऊ नये, यासाठी शुक्रवारी (दि. ४) छत्रपती संभाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले.

पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या नारायणपेठ गावात शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे, मच्छिंद्र टिंगरे, सुनील पालवे, रवी पडवळ, सागर पोमण, दिनेश ढगे यांनी हे उपोषण सुरू केले आहे.

संभाजीबिडी हे नाव बदलल्याशिवाय हे उपोषण माघारी घेणार नसल्याची भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे. दरम्यान,
शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांचे बिडीला दिलेले नाव हटवण्यासाठी पुणे, चंद्रपूर, हिंगोली,
वसमत, सोलापूर, सातारा, जालना, नाशिक, अहमदनगर, जिल्ह्यांतील अनेक तालुक्‍यांत शुक्रवारपासून आंदोलने सुरू
झाली आहेत.

खा. छत्रपती उदयनराजेंचा आंदोलनास पाठिंबा


छत्रपती संभाजी महाराज यांचे बिडीला दिलेल्या नावास आक्षेप आहे. नाव हटवण्यासाठी सुरू असलेल्या शिवधर्म फाउंडेशनच्या
उपोषणास पाठिंबा असल्याचे खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी लेखी पत्र दिले आहे.

७ षण हवाला
5ळ 5, 2020 7382 ॥0. 1
॥शाककशा पकी .९०. या

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!