शिवजयंती २०२० निमित्त शिवविचार


लख्तर स्वराज्यविचारांची


लेखक-✒ ओंकार राजू गवळी
मोबाइल- ९१४५५५९४५३

स्वराज्य म्हणजे स्वकीयांचे राज्य, आया बहिणींना सन्मानाने जगवणारे राज्य, गोरगरिबांचे श्रींचे राज्य!
या विचारातून ३५० वर्षापूर्वी शिवछत्रपतींनी युगा-युगापासून अडकलेल्या गुलामीच्या साखळदंडातून सह्याद्रीला मुक्त केले.

धारोष्ट रक्त वाहून स्वराज्याचे तोरण या भूमंडळी सजले .
रयत स्वराज्यविचारांनी सुखी, हर्षो उल्लासित झाली. कारण, या धरणीवर राज्य करत होते साक्षात शिवछत्रपती!!


छत्रपती शिवाजी महाराज


हे तेच स्वराज्य जिथे स्त्रीच्या पदराला हाथ घातल्यामुळे रांझ्याच्या पाटलाचा चौरंगा झाला होता!
हे तेच शिवविचार होते, जे इतर पुरूषश्रेष्ठांपासुन छत्रपतींना वेगळे बनवत होते.
हा तोच महाराष्ट्र आहे ज्याने यवनांच्या सुनेचा आदरसत्कार झालेला आपल्या डोळ्यांनी पाहिला होता.

आज त्याच आपल्या महाराष्ट्रात आपल्या आया-बहिणींची विटंबना चालू असताना शिवविचारांचा मावळा शांत का.. ?


कोपर्डी, पाथर्डी, औरंगाबाद, पेण, हिंगणघाट अशा अनेक ठिकाणी, जिथे शिवबांच्या विचारांना पाचर मारुन स्त्रीच्या चारित्र्याचे लचके तोडण्यात आले.


शिवजयंती जवळ आली की “भगवा” धारण करुन फिरणारे मर्द मावळे कुठ गले ?


स्त्री ही स्वराज्याच्या देवघरातील पुष्प, ही आऊसाहेबांची शिकवण काळाच्या ओघात विरली की काय ?
कुठल्या दिशेला चाललय शिवबाच “स्वराज्य” ?

आज आपल्या विचारांची झालेली ही अवस्था पाहून छत्रपती एकच विचार करत असतील,


यासाठीच का स्वराज्याचा राज्याभिषेक केला होता रायरेश्वराच्या मंदिरी ?


काम,मत्सर,लोभ या त्रिसुत्रातून आपण शिवबांच्या विचारांना तिलांजली देत चाललोय, हे तर परमसत्य आहे .

आज या महाराष्ट्राला या देशाला गरज आहे ती नितीमत्ता आणि विचार स्वच्छ असलेल्या “मावळ्याची”.


एकवेळ तुम्ही कोणत्या गडकोटाला जाऊ नका. एकवेळ तुम्ही शिवजयंतीत सामील होऊ नका.

एकवेळ तुम्ही इतिहास संवर्धनाच्या बाजारगप्पा मारु नका.

पण परस्त्री चा सन्मान करायला शिका गड्यांनो तरच हा देश, हा महाराष्ट्र टिकेल.

नाहीतर, स्वराज्याची लख्तर बेअब्रुच्या वेशीला टांगलेली पाहण्याच दुर्भाग्य शिवछत्रपतींच्या नशिबाला येईल.


आपण सर्वांनी या शिवजयंतीला प्रतिद्या करुयात की “छत्रपती शिवाजी महाराजांनी हाथी घेतलेले हे कार्य, हे शिवविचार आपण आपल्या पुढील पीढ़ीपर्यंत पोहचुयात.

आणि शिवविचार आपण आपल्या अंगात, आपल्या रक्तारक्तामधे उतरवुयात.


जय जिजाऊ। जय शिवराय।जय शंभुराजे

11 thoughts on “शिवजयंती २०२० निमित्त शिवविचार”

  1. छान लिहल आहेस, अजुन विचार मांडत जा..आजच्या काळाची गरज आहे ती..शिवजयंतीच्या खुप खुप शुभेच्छा..
    || जय शिवराय ||

  2. मस्त ओंकार शेठ, प्रत्येकाने फक्त शिवरायांच्या नावाचा गजर न करता त्या सोबत त्यांचे विचार आत्मसाद केले पाहिजे आणि “we must repspect women” because we are on an earth because of her. Keep it up… 🙏🙏

  3. दिनेश भोसले

    वाह! खुप सुरेख लेख आज बर्याच दिवसांनी वाचायला मिळाला. धन्यवाद! जय जिजाऊ जय शिवराय….

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!