श्री सखी महाराणी येसूबाईंनी भोगलेलं दुःख द्रौपदीच्या वाट्याला देखील आलं नसेल.

माहेरवर फितुरीचा कलंक, पतीची चाळीस दिवस हाल हाल करून हत्या आणि स्वतः सतत तीस वर्षे पापी औरंग्याच्या कैदेत, इतके दुःख द्रौपदीच्या वाट्याला देखील आले नसतील!

स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचे शेवटचे काही भागच शिल्लक राहिलेले आहेत.

महाराणी येसूबाईंना ‘आपल्या राजाचे डोळे काढले’ असं जेव्हा खंडो बल्लाळ सांगतात तेव्हा ह्रदय अक्षरशः धडधड करायला लागते.

लगेच आपण १६८९ मध्ये जातो, आणि विचार करायला लागतो की, त्यावेळेस काय परिस्थिती मधून गेले असतील स्वराज्यातील या व्यक्ती!


आपल्या पतीबरोबर, छत्रपती संभाजी महाराजांबरोबर असे काही घडतेय हे ऐकून मनाला कठोर करून, या माऊलीने स्वराज्याकडे लक्ष दिले.

मित्रांनो या देवरूपी व्यक्तींचे आपल्या प्रत्येकाच्या जीवनात ऋण आहे.व हे कर्ज फेडण्याची आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे.

आपण आज काही जे जीवन जगतोय त्यामागे या देवरूपी वीरांच्या बलिदानाचे, त्यागाचे कारण आहे.

मला कुणी आज विचारले की, बाबा तू देव पाहिलास का? तर मी सांगेन हो मी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी येसूबाई व अशा प्रत्येक स्वामिनिष्ठ मावळ्यांध्ये मला देव दिसला.

मित्रांनो, किती दुर्देवाची गोष्ट आहे की आपल्याला अजूनपर्यंत हे वीर व त्यांचे बलिदान माहीत नसावे!

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेपूर्वी कुणाला जर प्रश्न विचारला असता की, अरे महाराणी येसूबाई कोण आहे?तरर उत्तर आले असते, “असेल कोणी तरी, महाराणी की तीने आयुष्यभर ऐशआरामात काढले असतील?” हे किती आपले दुर्दैव्य!

महाराणी येसूबाईबद्दल शिवभक्त ओंकार गवळी यांनी आपले मनाला भेदणारे विचार मांडले आहेत.ते पुढीलप्रमाणे,

आयुष्य जेव्हा रोज दुखाची डोंगर ऊरावर उभारत असते आणि जिव नकोसा झालेला असतो.
तेव्हा कळत नाही काय कराव!

कळत नाही कोणत्या दिशेला पहाव!

कोणाला भजाव? कोणाच स्मरण कराव ?

सर्व दिशा जेव्हा अंधारलेल्या वाटतात.जिव नकोसा वाटतो.

अस वाटत की, बस्स आता संपल सगळ सगळ करुन ही पदरी घोर निराशाच!

तेव्हा, ही रखुमाई दिसते फक्त !!


तिचं आयुष्य किती आडवळनांच, किती दुखांच्या लाटांनी तीच्या मनाच्या किनार्‍यावर येऊन तिच्या स्वप्नांचे रेतीचे मनोरे वाहून न्हेले.

पण तरी ती दुखाच्या सागरात “भिजली”नाही.


“पदरी रूद्र! नशिबी फितुरीचा समुद्र!” तरी ती लढली तिच आयुष्यच जणू संकटांच ‘राजमुकुट’ धरुन होत.

कुंती, द्रौपदी, पद्मावती यांच्या आयुष्याची पाने जतन करून ठेवणार्‍या नियतीने तुला जगाशी आलिप्त ठेवले.


रुखमाई, कारण तिला ही ठाऊक होत तू कधी या निष्ठूर बोरुबहाद्दरांना समजणारच नाहीस.

तुझ्या जन्माची नोंदही ज्याला घ्यावी वाटली नाही, तो ईतिहासच किती पाषाणहृदयी ?

जग विसरेल तुझी कैद!


इतिहास नाहीसा करेल तुझ्या आयुष्याच्या पाऊलखुणा!


पण तुझी असंख्य लेकरे तुझ्या प्रेरणेने भवानीच्या पोताप्रमाणे धगधगत राहतील- स्वराज्य विचारांसाठी!

जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय येसूबाईराणीसाहेब!

मित्रांनो तुम्हाला देखील महाराणी येसूबाईबद्दल काही सांगायचे असेल तर कंमेंट करा.अथवा आम्हाला ७०२१५७४०२१ या नंबर वर लेख पाठवा.

2 thoughts on “श्री सखी महाराणी येसूबाईंनी भोगलेलं दुःख द्रौपदीच्या वाट्याला देखील आलं नसेल.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!