राजापूरच्या खाडीतून जोराचा वारा वाहत होता. शंभूराजांना काही केल्या झोप सत करती खंडो बल्लाळ चार दिवसांमागेच तळावर येऊन दाखल झाले होते. राजांनी त्यांना पाचारण केले.खंडोजी कनातीच्या आत येताच राजांचे लक्ष त्यांच्या उभट नाकसरीकडे आणि चमकदार डोळ्यांकडे गेले. क्षणभर त्या भिरभिर वाऱ्यातून बाळाजीपंत चिटणीसच आत आल्याचा त्यांना भास झाला. राजांनी खंडोजींना समोर बसायची आज्ञा केली.
थोड्या इतर गोष्टी झाल्या. नंतर शंभूराजे बोलले, “खंडोबा..आपण राज्याचे चिटणीस आहात. त्यात आज तारापूर , ठाणे, चौल, रेवदंडा अशा अनेक जागी किनारपट्टीवर जंग पेटला आहे. एका वेळी किती आघाड्या! अशा वेळी चिटणीस या नात्याने आपण खरं तर रायगडावरच थांबायला हवं होतं.”
“पण महाराज-?”
“एकट्या महाराणींच्या शिरावर किती भार टाकायचा खंडोजी? कविराज जरी तिकडे राजधानीत असते तरी आम्ही फडाची इतकी पर्वा केली नसती. मला वाटतं आपण लवकरात लवकर तिकडेच निघावं हे उत्तम.”
खंडो बल्लाळ तसेच मान खाली घालून बसले होते. त्यांच्या थंडया प्रतिसादाने शंभूराजे विचलित झाल्याचे दिसले. तेव्हा खंडो बल्लाळ लगबगीने बोलले, “महाराज, मी का माझ्या मनानं आलो आहे? महाराणीसाहेबांनीच मला आपणाकडं पाठवलंय..!
“म्हणजे?”
“राणीसाहेबांच्या मते आपलं ग्रहमान सध्या ठीक नाही; म्हणून मी आपल्या-सोबत सावलीसारखं राहावं.”
आपल्या लाडक्या राणीचा आठवाने राजांच्या वृत्ती प्रफुल्लित झाल्या. मंद हसत भारावल्यासारखे ते बोलले “एवढ्या मोठ्या राज्याचा कारभार अगदी स्वत:च्या सही शिक्क्यानं पाहतात महाराणीसाहेब. पण आमचं थोडंसं कुठं दुखलंखुपलं तरी त्यांचा जीव गोळा होतो!”
राजांची हसरी मुद्रा पाहून खंडो बल्लाळांच्याही जिवात जीव आला. ते बोलले, “राजे, मीं इथे थांबण्यात माझाही थोडा स्वार्थ आहेच!”
“मतलब?”
“आपल्या तलवारीच्या तडाख्याने मराठ्यांचा छत्रपती गोव्याची दामटी कशी करतो, हे मला माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहायचंय!”
शंभूराजांचे नेत्र चमकले. त्यांनी मोठ्या अभिमानाने खंडो बल्लाळांकडे ओझरती नजर टाकली.
“आता अधिक वेळ गुजरण्यात काय मतलब, राजन? तो व्हाइसरॉय नुसताच चलाख आणि चतुर नाही, तर तो तितकाच कपटी आणि गद्दार असल्याचंही सिद्ध झालं आहे. आता थांबू नका! कोणत्या ना कोणत्या कारणाने त्या फिरंग्याला युद्धात
खेचायलाच हवं.” दुर्गादास राठोड आग्रहाने बोलले.
राजापूरजवळच्या डोंगराजवळ संभाजी महाराजांचे डेरेदांडे उभारले गेले होते. खाशा डेऱ्यामध्ये आज महत्त्वाची मसलत चालली होती. संभाजी महाराजांच्या समोर कवी कलश, दुर्गादास रोड हया अकबर, येसाजी कंक सभोवार बसले होते. डेऱ्याच्या कनातखिडकीोतून खाली उताराच्या अंगाला राजापूरची खाडी होती, तिथले चमचमते पाणी आणि वाऱ्यावर हेलकावे खाणारी नारळी पोफळीची झाडे दिसत होती.
शंभूराजे सत्तरीकडे झुकलेल्या सरदार येसाजी कंकांकडे एकटक नजरेने पाहत होते. येसाजीबाबांच्या डोक्यावरची पीळदार पगडी, अंगातला जरीचा सैलसर अंगरखा आणि कमरेचा पांढरा शुभ्र जामा अशा दिमाखदार वेषामध्ये त्यांची वृद्ध मूर्ती खुलून दिसत होती. त्यांच्याच पलीकडे दिसायला खूप देखणा आणि कुर्रेबाज असा एके नवयुवक बसला होता. पंचविशीतला तो तरुण कृष्णाजी येसाजीबाबांचा लाडका पुत्र होता.
राजे म्हणाले, “येसाजीमामा, आपण मराठा पायदळाचे सेनापती आहात. या मोहिमेत खूप मोठी जोखीम आम्ही तुमच्यावर सोपवणार आहोत.”नाही “राजे, आपण आगीत उडी टाका म्हणालात, तरी हा म्हातारा मागंपुढं बघणार नाही!”
“खूप भरवसा आहे मामा तुमचा. आमच्या आबासाहेबासोबत आपण आग्रा शहरही पाहिलेत. कर्नाटकाकडे आबासाहेबांनी आम्हांला नेले नाही. आपण मात्र त्या मोहिमेतील एक बिनीचे सरदार होता.”
“बाळराजे, काल कोंडाजीसारखा वीर आगीत जळून खाक झालाच की
तुमच्यासाठी. आज हा शिवबाचा येसाजी, हे म्हातारं हाड सुदीक तुमच्यासाठी जळून खाक व्हायला तयार आहे.” बेठकीपुढे
गोव्यावर करावयाच्या आक्रमणाचाच मुद्दा बैठकीपुढे आला होता. तिथल्या खाड्या, बंदरे, पोर्तुगीज किल्ले-तटबंद्या, जागोजागचे मोठे चर्च आणि त्यांचे संरक्षण करणारी फिरंगी पथके, पणजीचा गोलाकार बुरूज, बळकट वेशी दुखावली ताते साऱ्या मुद्या खूप तपशीलवार चर्चा झाली. कौंट दी आल्व्होरमुळे संभाजी राजे कमालीचे दुखावले होते.

ते बोलले, “हा फिरंगी कमालीचा स्वार्थी, घातकी नाटक्या आहे. एकीकडे आम्हांला पुत्ररत्न झालं म्हणून रायगडाकडे अभिनंदनाचा खलिता आणि बाळासाठी हिऱ्या मानकांचा करदोडा, बिंदल्या पाठवतो; आणि नारव्याला तीर्थासाठी आम्ही कमी फौजेनिशी येणार, तेव्हा आम्हांला जिवंत पकडून पातशहाकडे पेश करण्याचे धाडसी मनसुबे ही रचतो. नव्हे तशी धडपडही करतो. सांगा..! काय करायचं याचं?”
“हमला! गोव्यावर तपाला त रे तरी काय?” येसाजी कंक गरजले.
“उघा औरंग्याच्या फौजा गोव्याच्या किनारी आल्या तर हा बेडकासारखी टुणकन उडी मारून प्रथम तिकडे जाणारच! ह्या भामट्याने आमच्याशी सख्प़ असल्याचा वरून कितीही देखावा करू देत, उलट ह्या पोर्तुगीजांनी पातशहाशी एक अत्यंत गुप्त,
लेखीटाकी करार केला आहे.” राजांनी सांगून टाकले.
“काय सांगता, राजे?” सर्वांनी चक्रावून विचारले.
“कविराज, कुठे आहे तो कागद?”
कलशांनी एक टिपण सादर केले. गुप्तहेरांनी पोर्तुगीज आणि पातशहाच्या दरम्यान झालेल्या कराराची कलमेच पटकन आणली सा त्यानुसार मराठ्यांचा कोकणातला जितका मुलूख पातशहा वा पोर्तुगीजांकडून जिंकला जाईल, तो सारा पोर्ठुगीजांनाच दिला जाणार होता. त्या बदली पणजीजवळ मोगलांना एक नाविक तळवती पर्वात पोर्तुगीजांनी द्यायची होती. व्हाइसरॉयची सारी असलियत उघडी
पडली.
शंभूराजे निर्धारानं बोलले, “हा सोयरा औरंग्याकडे जाऊन पोचण्याआधीच त्याला लुळापांगळा बनवायला हवा.”
राजाच “मग आता थांबायचं कशाला? चला…. गोव्यावर हमला.. -”राजांचे सारेच सहकारी उद्घोष करू लागले. बेठकीतून जणू कूचाच्या नगाऱ्याचे आवाजच घुमू लागले. पोर्तुगीजांच्या
मात्र संभाजी महाराज कमालीच्या तणावाखाली दिसले.
ते बोलले,।।
पणजीच्या तटबेंदीवरच्या अव्वल तोफा, त्यांच्या कवायती फौजा, उंची बारूद आणि मुख्यत: त्या खाड्यांतून लीलया वावरणाऱ्या युद्धनौका लक्षात घेता त्यांच्यावर सरळ
हमला करणं धाडसाचं ठरेल. पण बघू, काढू काहीतरी मार्ग
त्यारात्री राजांनी मुंबईकर इंग्रजांना तातडीने खलिता लिहिला. दक्षिणेत जिंजीला त्यांना व्यापाराचा परवाना हवा होता , “गी मागणी येऊन इंग्रजांनी रायगडाकडे अनेकदा खेटे घातले होते. शंभूराजे , “कविराज, इंग्रजांना हवा असलेला जिंजीजवळच्या व्यापाराचा परवाना उद्याच्या उद्या त्यांच्या माझगावच्या वखारीकडे पाठवून द्या. एका
वेळी सारेच टोपीकर अंगावर घेणे शहाणपणाचं ठरणार नाही!”
रात्री कवी कलश, खंडो बल्लाळ आणि येसाजी कंक राजापूरच्या खाडी किनाऱ्याने फेरफटका मारत होते. आत फुटणाऱ्या लाटांचे प्रतिध्वनी कानांवर आदळत होते संभाजी महाराज आपल्या मनातली रुखरुख व्यक्त करीत बोलले, “येसाजी- काका,
, स्थिरावून पोर्तुगीजांना शंभर वर्ष झाली आहेत. या गोष्टी डोळ्याआड
नकोत करायला. त्यांच्या तोफांची आणि गलबतांची ताकद मोठीच आहे. दर्याच्या त्या पाण्यावर आमच्या घोड्यांचे पाय कसे चालणार?” _- बोलता बोलता पुळणीतल्या
वाळूत शंभूराजांच्या मोजड्या रुतल्या. ते थांबले. हर्षभरित होऊन विचारू लागले,
पुढील भाग पाहण्यासाठी खालील फोटोवर एकदा क्लिक करा.

Pingback: छत्रपती संभाजी महाराजांचा गोवा मोहिमेवरील पराक्रम-१