पळशी गावातील ही जगावेगळी प्रेमकहाणी

शिवप्रेमींनो, आज आपण अशा एका प्रेमकहाणीबद्दल जाणून घेणार आहोत. ती वाचल्यावर नक्कीच तुम्हाला अभिमान वाटेल.तर मित्रांनो,लग्नादिवशी दारात लावलेली केळीची पानं सुकून गेलेली होती. लग्नाला
आलेले मोजकेच पाहुणे घरामध्ये होते सत्यनारायणाची पूजा संपते, बामण
निघून जातो.आणि नवरी भरजरी साडीतून अवघडत उठून उभी राहते.


अन्‌ अन्‌… अचानक नवरा तिच्या समोर येतो. व म्हणतो की, ‘आजपासून साडीत
अवघडायचं नाही, हा घे पंजाबी ड्रेस, आतली रूम तुझी… आणि
ही पुस्तकं, अभ्यास कर… दोन वर्षांत पीएसआय बनायचं! आणि झाली सुरवात एका विलक्षण क्रांतीला!

हनीमून का काय असतं, त्याला न जाता बायकोचा अभ्यास घेत
राहिला नवरा! प्रणयमूल्यांकित गोलगप्पा मारण्यापेक्षा जनरल
नॉलेज शिकवत राहिला नवरा. नाव जयदीप पिसाळ देशमुख! हे महाशय
दोनदा एमपीएससी पास झाले… पीएसआय आणि कुठलीशी पोस्ट
मिळाली… वाठार स्टेशनला तीन मिनिटं रेल्वे थांबायची, तेवढ्या वेळेत
दहा-बारा ग्लास उसाचा रस विकायचा… त्यातनं ग्लासमागे रुपयाचा
ठोकळा मिळायचा… असलं झांगड करत जयदीपराव एमपीएससी
दोनदा पास झाले… पण… पण… ‘व्यवसाय करू, गावाची सेवा करू’
म्हणत पोस्ट नाकारल्या… हीरो-होंडाची सेमी-फ्रच्नायझी घेतली,
पळशी गावचे सरपंच झाले… खाचखळणग्याच्या गावात सिमेंटचे रस्ते
केले. गावाशेजारचा बंधारा बांधला. ‘पानी फाऊंडेशन’चं काम
केलं.पळशी गौरव पुरस्कार सोहळा परमोच्च केला. आणि काय
काय!
एमपीएससी पास होऊनही पोस्ट न घेणाऱ्या जयदीपरावांची भागात छी-थू झाली… एमपीएससीचं फॅड असलेले तरूण जयदीपरावांकडे ‘माजोरडा’ म्हणत तुच्छतेनं पाहू लागले.. विजयाच्या आनंदाला लपवत, पराभवाची बोच पचवणारे जयदीपराव हलले
नाहीत. लढत राहिले.
पण वाळल्या-करपल्या जगण्याच्या
जळण्यात एक ओल होती मनात… करपतानाही मनात एक ऊबदार
जाळ होता पेटलेला… कल्याणी पिसाळवर जीव जडला होता… ‘अय
पोरा, काम ना धाम, यमपीयस्सी पास हुऊन बोंबलत फिरतूय,
दुनयादारी-गावपुढारी झालायस, तुला पोरगी देण्यापरीस विहिरीत
ढकलून दीन पोरगी’ कल्याणीच्या बापाचे हे शब्द… ‘तुमच्या पोरीला
दोन वर्षांत पीएसआय करतो, माझ्यावर विश्वास ठेवा’ म्हणणाऱ्या या
पोराला कल्याणी मिळाली.
पूजेनंतर अवघ्या दोन वर्षांत कल्याणी
पीएसआय झाली… सगळं माहित पडत होतं… एकदा जयदीपरावांना
विचारलं… ‘हीरो-होंडाचा व्यवसाय जोरातय, गावात सरपंचय, भागांत
दबदबाय, लोक नमस्कार करतात, आता काय स्वप्न राह्यमलंय?’ ‘काका,
सगळं मिळालं, तिचं ट्रेनिंग संपलं की युनिफॉर्मवरच्या बायकोलाएकदा सॅल्यूट मारायचाय.हीच ईच्छा!

मित्रानो हीच ती जिद्द आणि जगावेगळी प्रेमकहाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळेच करू शकतात.

1 thought on “पळशी गावातील ही जगावेगळी प्रेमकहाणी”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!