लॉकडाऊनमुळे मुंबईतील घाटकोपर भागात अडकलेल्या एका अतिउत्साही जावयाने चक्क मुंबई ते पारनेर पायी प्रवास करत रात्री बेरात्री लपत छपत पोलिसांचा डोळा चुकवत अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन हा सासुरवाडीचा गाव गाठला खरा.पण सासुरवाडीत पोहचल्यानंतर तीनच दिवसात त्याचा कोरोनाने
मृत्यू झाला.
दरम्यान याबाबत काहीच माहीत नसणाऱ्या सासुरबाडीतील तब्बल २७७ जणांना या जावयाने कोरोना संशयित केले.घाटकोपरला नोकरीला असलेले एक जावईबापू लॉक डाऊनला वैतागून आणि
बायकोला भेटण्यासाठी थेट घाटकोपर ते पारनेर असा पायी
प्रवास करून आले.

इतक्यालांबून जावई बापू आले म्हणून त्यांचे सासुरवाडीत जंगी स्वागत झाले. बायको,मेव्हणे,सासू-सासरे, सोडाच …. गावकर्यांनी… सुद्धा जावईबापूंची भरपूर आवभगत केली.
दोन दिवस हा पाहुणचार चालला आणि अचानक अख्खे गाव
खोकला,ताप,पडश्याने गांजले.मग दवाखाना गाठला. जावई बापू अर्थात पहिल्या नंबरला होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि नगरला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असतानाच ते कोरोना पॉजिटीव्ह निघाले.
त्यातच. त्यांचा मृत्यू झाला… नंतर काय झाले याचा
सगळ्या गावाच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. जावईबापू तर जीवानिशी गेलेच पण सोबत त्यांनी आता सासुरबाडीतल्या
२०० जणांचे जीव टांगणीला लावले आहेत.