मित्रांनो, येत्या ५ ऑगस्ट रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऐतिहासिक प्रभू श्री राम मंदिर भूमिपूजन होणार आहे. ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे.
खूप दिवसापासून प्रभू श्री राम मंदिर वाद सुरू होता. तोच वाद भविष्यात होऊ नये म्हणून एक अनोखी शक्कल लढवली गेली आहे. त्याबद्दल आपण आज चर्चा करूयात.

भविष्यात, प्रभू श्रीराम मंदिर उभारणीवरून वाद होऊ नये म्हणून २००० फूट जमिनीमध्ये टाईम कॅप्सूल पुरवण्यात आला आहे.तो तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता.

या कॅप्सूल मध्ये मंदिराशी निगडित इतिहास व तथ्य याची माहिती साठवलेली आहे. भविष्यात कुणी पण याबद्दल वाद उपस्तीत केला तर त्याला या कॅप्सूल मधून सर्व पुरावे मिळू शकेल. सुप्रीम कोर्टानेच हे आदेश दिले आहे.

तसेच ५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या भूमिपूजन साठी प्रभू श्रीराम यांचे पावले ज्या ज्या ठिकाणी पडले होते. त्या ठिकाणचे पाणी जल अभिषेकासाठी आणले जाणार आहे अशी माहिती ट्रस्टचे सदस्य कामेश्वर चौपाल यांनी सांगितले.