धना भाग ११ Dhana bhag 11

धना आणि त्याचे अंगरक्षक सह्याद्रीच्या काळजात असलेल्या प्राचीन किल्ल्यावरील साम्राज्यात पोहचले.
धना ने घडलेली हकीकत सेनापतींच्या कानी घातली…!
धना भरलेल्या नयनांनी आपल्या खोलीत खूप विचारमग्न झाला..!


देशासाठी प्राणप्रिय लोकांची ताटातूट त्याने सहन केली होती. आणि त्याचा त्याला अभिमान पण होती.तो एका अश्या संघटनेचा राजा होणार होता ज्या संघटनेने कितीही देशाची कामे केली तरी बाहेरच्या समाजाला त्यांचा थांगपत्ता नव्हता.


जीव जरी गेला तरी कोणतेही पदक आणि मानसन्मान नव्हते.अश्या संपूर्णपणे अलिप्त संघटनेसाठी स्वताच्या आयुष्याची आहुती देण्यासाठी धनाने मनाची तयारी केली होती…! मात्र एक गोष्ट मात्र मनात सलत होती.
माझ्या जागेवर सूर्याजी कुस्ती खेळणार ?


माझी जागा कोणी घेतलेली धनाला असह्य झाले होते..!
मनात काहीतरी खुणगाठ बांधून धना राजांच्या भेटीला गेला..!
राजे मोठ्या देश्कार्याच्या खलबतीत होते,धनाला पाहून सर्वांनी बसायची विनंती केली….!


खलबतीचा विषय होता पंजाब प्रांतातून अमृतसर मध्ये काही लोकांनी संघटनेची मदत मागितली होती..!
काही गुप्त लोकाना संघटन माहित होते.


पंजाब मधील काही अतिरेकी संघटनांना देशाचे स्वातंत्र्य मंजूर नव्हते ,त्याचा एकत्रित परिणाम म्हणून त्यानी पंजाबात अतिरेकी कारवाया करून कित्येक निष्पाप जीव मारले ..राजानी गुप्तहेराकडून खबर मिळवली होती कि पंजाबातील काही देशद्रोही लोक त्याना मदत करतात ,त्यापैकी एकजण काही दिवसात कोल्हापुरात कुस्त्यासाठी येत आहे…!


धना ला कुतूहल वाटले आणि मध्येच चर्चा थांबवत धना उद्गगारला..हा पंजाबी पैलवान तर नाही ?
उपस्थित सरदारांनी होकारार्थी माना हालवल्या…!
धना ला मोठा धक्का बसला …तो पुढे बोलला.


राजे..ती मंडळी एकूण ५-६ जन असावीत आणि आज उद्या कराड भागात दाखल होतील ,त्याना शासकीय परवाने आहेत व ते खास कुस्तीसाठी कोल्हापुरात येत आहेत ..आणि विशेष म्हणजे ती कुस्ती माझ्यासोबत होणार होती..!


राजानी हे सर्व आधीच माहित होते …ते म्हणाले धना हि गोष्ट आमच्या ६ महिन्यापूर्वीच ध्यानात आली होती …सहा महिन्यापूर्वी त्याने तुला पाडले तेव्हा आमच्या बंदुकीच्या निशाण्यावर त्याचे डोके होते ….त्याचा तो आखरी दिवस होता.!


पण,तू शपथ खाल्लीस कि मी याला पाडीन..म्हणून आम्ही थांबलो.पण आमचा कयास चुकला ..नशिबाने तुला इतक्या लौकर आमच्या जवळ आणले याची आम्ही कधी कल्पनाही केली नव्हती…!असो…पण आता नियोजन ठरले आहे.जर या बिल्ला आणि त्याच्या साथीदाराना आपण जीवन पकडले तर अतिरेकी कारवाया करणार्या मोठ्या गद्दारा पर्यंत आपण पोहचू आणि पंजाब प्रांत या दुखातून कायमचा मुक्त करू ….!


यावर धना पटकन उद्गारला..राजे माफ करा पण हि मोहीम मला द्याल का ?
मी बिल्ला व साथीदारांना आणतो ..मला सर्व हक्क द्या या मोहिमेचे.!
मला यातून अनुभव पण घेता येईल आणि माझ्यातील मनातील वादळ पण शमवता येईल ….!


असे म्हणत राजे आणि धना एकांतात काहीकाळ खलबत करत बाजूला निघून गेले ..क्षणात राजानी सेनापती ना आज्ञा केली …सेनापती फौजेतील चिवट शिलेदार निवडा आणि धनाला या मोहिमेची सुपारी द्या ..आम्ही काही काळासाठी कर्नाटकात जातोय..!


आणि धना हि मोहीम तू पार पाडशील यात शंका नाही ,पण निर्णय जीवघेणा आहे ,थोडी काळजी घे ,एक चूक आणि सर्वकाही नष्ट होणार..!
धना होकारार्थी मान हलवली आणि मुजरा करून निघाला ..!

धनाच्या डोक्यात विचारचक्रे फिरू लागली ,त्यानी सेनापती ला बोलावून घेतले आणि डोक्यातील विचार कथन करायला सुरवात केली..!
सेनापती …कुस्ती माझे जीवन होते आणि जन्मोजन्मी ते राहील.
मला तुम्ही गावाकडे जायला परवानगी दिलीत तशी आणखी एक परवानगी द्याल ?


सेनापती शांतपणे म्हणाले…बोला धनाजीराव ,काय आहे मनात ?
मी माझी हकीकत तुमच्या कानावर घातलीच आहे,मला एक मदत करा म्हणत धनाने सेनापतींच्या कानात एक गोष्ट सांगितली …!
सेनापती धीरगंभीर मुद्रेत हासले ..!
धनाजीराव उठता बसता हे असले जीवघेणे काम करणे हे तुमच्या सार्या घराण्याचीच रीत दिसते …!


ते खुपवेळ स्मित करत म्हणाले …मजा येणार आहे या मोहिमेत ..!
यश अपयश जगदंबा बघून घेईल..मात्र ठरलेले काम आवरले कि कोणत्याही मोहजालात न अडकता त्वरीत किल्ल्याकडे या ….!
धनाने हासून सेनापतीला मिठी मारली …!
नेमकी काय वार्ता सांगितली धनाने कानात ??
काय ती फक्त दोघांनाच माहिती…पण होती मात्र जीवघेणी आणि धाडसी..!


रात्र होताच धना आणि चिवट १० शिलेदार कराडकडे कूच करीत निघाले..!
काम होते बिल्ला पंजाबी आणि त्याचे जे ५-६ काही साथीदार असतील त्याना जिवंत ताब्यात घेवून किल्ल्यावर आणून ठेवणे …!
मजल दरमजल करत धना आणि साथीदारानी कृष्णा नदी ओलांडली..!


मध्यरात्र उलटून गेली होती..रात्रीच्या किर्र अंधारात उरात मोठे धाडसी मनसुबे घेवून धना कराडच्या शासकीय विश्रामगृहाकडे निघाला..!
विश्रामगृहामागे धना आणि साथीदार थांबले..!
सोबत आणलेली मोटारगाडी झाडीत बाजूला उभी केली.
धनाने येताना वेषांतर करण्याचे साहित्य,छोटी शस्त्रे आधीच आणली होती,सर्व साथीदाराना धना नियोजन सांगू लागला..!


फक्त ४ जणांनी आत घुसायचे..!
६ जण बाहेर थांबतील ..ऐन वेळी मोहिमेची चाहूल पोलिसाना लागली तर काय कराचे याचे नियोजन झाले..!
धनाने सोबत आणलेला पोलिसी पेहराव घातला,इतर चार जणांनी पोलीस शिपाई म्हणून सोंग घेतले आणि तडक विश्रामगृहाच्या मुख्य दरवाजात गेले..!


पहारेकरी झोपला होता…त्याला उठवले ..!
”हारामखोर …असा पहारा देता काय ?
अंगावरची कातडी काढली पाहिजेत तुमच्या …..गेट उघडा “
असा दम देताच पहारेकर्याची पाचावर धारण बसली …साहेब साहेब ..त त प प करू लागला ..!
गेट उघडून धना व साथीदार आत घुसले …!
पहारेकरी म्हणाला माफ करा साहेब ,आत आलेली पैलवान मंडळी यांना जेवण,दुध देऊन आलो आणि डूलका लागला ..!
माफ करा ….परत नाही अशी चूक होणार …!


धनाने मोठ्या आवजात आणखी एक धमकी दिली ….मूर्ख माणसा प्रती उत्तर नको देऊस…चल…मला पैलवानांची भेट घालून दे ..मला कलेक्टर साहेबांचे आदेश आलेत त्याना भेटायचे ..महत्वाचा निरोप आहे…आणखी एक सांग हे लोक कधी पोहचले इथे ?
साहेब आज दुपारी आलेत..सोबत सरकारी पत्र होते म्हणून त्याना प्रवेश दिला.!


आणखी कोण कोण भेटून गेले ..किती जन आहेत ? धनाने विचारले..!
कोणीही नाही ..एकूण ४ जन आहेत ..पहारेकरी बोलला..!


ठीक आहे चल…आणि तुम्हीहि चला सोबत असे म्हणत धना,पहारेकारी आनी ४ साथीदार पैलवान जिथे झोपलेले त्या खोलीत जाऊ लागले..!
पहारेकरी हातात चाव्या घेऊन पुढे चालत होता….!
मध्यरात्री बिल्ला पंजाबी आणि एकूण चार साथीदार जेवण करून गाढ झोपेत होते..!


२ दिवसाने त्याची सूर्याजी सोबत कुस्ती होती ….कुस्तीसाठी जाहिरात बाजी,निमंत्रणे हि आधीच सर्वत्र गेली होती..!
दरवाजा उघडला आणि पहारेकरी शिपायाने बिल्ला ला सातारचे पोलीस भेटायला आलेत असा संदेश दिला …!
बिल्ला व साथीदार उठून बसले …!


धनाने सोबत आणलेला फुलांचा गुच्च बिल्लाला देत बोलला …माफ किजीये पेहेलवान जी आपको रात को तकलीफ दि ….कलेक्टर साहब का आदेश था इसलिये ये सब करणा पडा ..!
बिल्ला हा ऐन तिशीतील गडी होता ….धना आणि त्याची कुस्ती झाली होती.


धना ला खूप चीड होती त्याच्याविषयी ..पण धना आता शक्तीपेक्षा युक्तीचा जास्त वापर करायला शिकला होता…!
नही नही..ऐसी कोई बात नही…आप हमारा इतना खयाल करते है यह सुनकर बडा अच्छा लगा..!
धना हसला आणि म्हणाला ….!
पेहेलवान जी आपको इस सरकारी अतिथीघर से साहब के आलिशान बंगले पे लाने के लिये कहां गया है,कल आपकी मेहमाननवाजी कर के आपको साहब खुद आपनी मोटारकार से कोल्हापूर से छोडने आयेंगे …!
यावर बिल्ला म्हणाला …अरे क्यू तकलीफ उठाते हो साहब…अभी सुबह हम आयेंगे ना मिलने ..अभी थक गये है..सुबह कसरत कुस्ती करेंगे और आयेंगे ..!
यावर धनाजी बोलला ..अरे सिर्फ १५ मिनिट पर घर है..बस यु जायेंगे..!
यावर बिल्ला आणि त्याच्या साथीदारांनी विचारार्थी येण्याचे काबुल केले आणि सामान आवरले …!


किल्ल्या पहारेकार्याच्या ताब्यात देत म्हणाला अरे याना उद्या कोल्हापुरला घेऊन जाणार आहोत,कोणी आले पैलवान कोल्हापुर रवाना झाले म्हणून सांग…!
आणि कामावर असताना झोपने म्हणजे देशद्रोह आहे,असे पुन्हा करु नकोस..!


यावर पहारेकरी हसला …काहीच बोलला नाही ..!
धना व सारा सरंजाम ठरलेल्या ठिकाणी चालु लागला.
इकडे धनाच्या इतर साथीदारांनी वाटेत दबा धरून बसलेल्या ठिकाणी धना आणि पैलवान येताक्षणीच हमला केला …!


बेसावध झालेल्या हल्याने बिल्ला ला परिस्थिति समजणे कठीण झाले ….एका साथीदाराने बेशुध्द होण्याचा बोळा बिललाच्या नाकाला लावला आणि बिल्ला शुध्द हारपला..!
इतर साथीदारांचे तेच हाल..!
ठरलेया नियोजनानुसार काळ्या कपड्यात ते ४ देह बांधून गाडीत घातले आणि गाडी किल्ल्याकडे निघाली..!


जवळपास तासभर गाडी रस्ता चालली आणि एका ठिकाणी धनाने गाडी थाम्बवायचे आदेश दिले.
वाटेत धना आणि ४ साथीदार उतरले..!
बिलाचे सर्व साहित्य जप्त करून ताब्यात घेतले त्यात त्याचे ओळखपत्र व शासकीय साहित्य होते..!
गाडीवान साथीदाराला आदेश केला कि सेनापतीना सांग..सर्व ठरल्याप्रमाणे घडेल…!
गाडी अंधार्या रात्रीत पुढे निघून गेली आणि धना आणि ४ साथीदार वाटेतल्या रेल्वे स्टेशनवर गेले.


पहाटे ३ च्या रेल्वेगाडीने धना कोल्हापूर ला निघाला होता ..!
कोल्हापूर ला ??
होय कोल्हापुरच …पण कशाला ?
अहो,ज्याने आयुष्य कुस्तीसाठी वाहिले त्याच्या जागी सूर्याजी लढणार होता नव्ह ….त्याला हे रुचले असते का ?
होय अगदी बरोबर…बिल्लाच्या जागी धना बिल्ला पंजाबी म्हणून लढणार होता..!


त्याला जणू पहायचे होते …त्याच्या राजलक्ष्मी ला प्रेमप्रस्ताव ठेवणारा वीर खरोखर त्या पात्रतेचा आहे का …आणि ६ महिन्यांचा कुस्ती जिंकण्याची घेतलेली शपथ त्याला पूर्ण करायची होती..त्याने माती उचलून शपथ घेतली होती तशी …!
वेषांतर,आवाज बदलने यात बेमालून बनावटगिरी करायला धना आता शिकला होता ..आणि एका पैलवानाला दुसर्या पैलवानाची नक्कल करायला कुठे फारसे कष्ट लागते ..!


बिल्लाची नक्कल करणे अवघड नव्हते…अवघड होते ते कुस्ती खेळताना वस्ताद काकांच्या नजरेला नजर मिळवणे…!
त्यासाठीच एक दिवस आधी तो कोल्हापुर ला निघाला होता..!
रेल्वे गाडी आली आणि मोठ्या धाडसी कामाने झपाटलेला धना गाडीत चढला …गाडी सुरु झाली …!

पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

2 thoughts on “धना भाग ११ Dhana bhag 11”

  1. Pingback: धना भाग १० Dhana Bhag 10 —

  2. Pingback: धना भाग १० Dhana bhag 10 —

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!