हरजीराजे महाडीक यांनी स्वराज्याशी फितुरी केली नव्हती.

कर्नाटक जिंजीचे छत्रपती शिवाजी महाराजांचे जावई हरजीराजे महाडीक यांनी स्वराज्याशी फितुरी केली होती का ? स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेला आता वेगळेच वळण लागले आहे. हरजीराजे महाडिक यांच्याबद्दल संशय निर्माण झालेला आहे. कि त्यांनी स्वराज्याशी फितुरी केली आहे,औरंगजेबाला पाठिंबा दिला. आणि या धक्कादायक माहितीने खळबळ उडालेली आहे. हरजीराजे महाडिक स्वराज्यनिष्टच होते हे आजपर्यंत आम्ही ऐकत आलो होतो. मग हे नवीन रहस्य उलगडण्यासाठी आम्ही इतिहास पहिला असता आम्हाला संभाजी या विश्वास पाटील यांच्या कादंबरीतून खालील माहिती मिळाली. वास्तविक संभाजी महाराजांच्या इतर पुस्तकांमध्ये हरजीराजांविरोधात कुठेही याबद्दल उल्लेख आढळत नाही कि त्यांनी अशी फितुरी केली होती.सर्वजण त्यांना स्वामिनिष्ठ म्हंणून उल्लेख करतात. आता आपण विश्वास पाटील यांनी हरजीराजे महाडिकक यांच्याबद्दल काय म्हंटले आहे !

साधारणतः १६८७ यावर्षी मध्ये महाराष्ट्रात दुष्काळ पडलेलाहोता. सर्वांना अन्नधान्यांची गरज भासू लागली होती.संभाजी महाराजांना हरजीराजांना,जिंजी वरून अन्नधान्य पाठवुन द्यावे असं सांगितले होते. परंतु हरजीराजांनी स्वतःला” जिंजीचे राजे” म्हणुन घोषित केले होते. रायगडाच्या सुखसत्तेशी आमचं काही देणंघेणं नाही अशी,उद्दामपणाची भाषा त्यांच्या तोंडात होती.शंभुराजांना जेव्हा हे कळलं, तेव्हा त्यांनी हरजीराजांना एक खलिता लिहून खडसावले असता, हरजीराजांनी संभाजी महाराजांना असा जवाब दिला की, “राजे असं काहीच घडलेलं नाही आम्हाला बदनाम करण्यासाठी ही दुष्मनांची चाल आहे. “परंतु शंभुराजांना हे माहित होते की हरजीराजे खोटं बोलत आहेत .त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज १२ हजारांची फौज घेऊन जिंजीकडे रवाना झाले.


जिंजित पोहचल्यानंतर संभाजी महाराजांनी हरजीराजे यांना सांगितले की, “हरजीदाजी, इतर वेळी रुसवेफुगवे चालतील, पण आता औरंगजेबासारखा दुष्ट स्वराज्याच्या वाटेवर टपुन आहे, त्यामुळे असे वागून चालणार नाही . त्यावर हरजीराजे बोलले,” राजे आपण त्याच त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा का उघडता तुम्हाला आमच्या हेतूबाबत शंका वाटते का ?”

त्यावर संभाजी महाराज म्हणाले, “दाजी,आपण जरा स्पष्ट विचारता म्हणून सांगतो.आम्हाला मिळालेल्या खात्रीदार बातमीनुसार स्वतंत्र राजा होण्याचा आणि स्वराज्याच्या छत्रपतींच्या सत्त्तेला अमान्य करण्याचा आपला विचार दिसतोय.”

“तसं असेल तर बिघडलं तरी कुठं ?,आणखी एक मराठी राज्य निर्माण होईल,” हरजीराजे बोलले.

संभाजी महाराज कडक शब्दात म्हणाले, ” तसं बिघडतं काहीच नाही हरजीराव!पण लक्षात ठेवा मंदिराचा प्रत्येक खांब स्वतःला कळस समजू लागला, तर मंदिर उभं राहणार तरी कसं ?”बोलता बोलता,संभाजी महाराज गंभीर झाले. दुःखी शब्दात ते म्हणाले मंदिरासागे खांब कधी त्यांच्या पायासाठी उपयोगी आलेल्या ओबडधोबड दगडांचा विचार करतात का ?त्या सर्व सामान्य लष्करी गडयांची, सैनिकांची फिकीर कोण करणार, हरजीदाजी?”


संभाजी महाराजांनी कर्नाटकातून माघारी येताना दहा हजार बैलांवरुनअन्नधान्य आणले होते. सुरवातीला रायगड आणि स्वराज्यात या नव्या रसदीने सर्वाना दिलासा दिला होता. दुष्काळ एवढा भयंकर होता की, आणलेले अन्नधान्य थोड्याच दिवसांत संपले. आणि स्वराज्याला पुन्हा अन्नधान्याची गरज भासू लागली. त्यावेळी संभाजी महाराजांनी हरजीराजेंना जिंजीवरून अन्नधान्य पाठवण्यासाठी पून्हा खलिता पाठवला परंतु; खूप दिवस झाले तरी जिंजीकडुन हरजीराजेंनी स्वराज्याला अन्नधान्याचा पुरवठा होत नव्हता .औरंगजेबासारखा अजगर स्वराज्याला थैमान घालत बसलेला असताना आणि दुसरीकडे दुष्काळात स्वराज्याचा मुलुख होरपळून जात असताना, हरजीराजे सारख्या माणसांनी असे का वागावे? हेच नेमके संभाजी महाराजांना समजत नव्हते. संभाजी महाराजांनी हरजीराजांना समजावून सांगण्यासाठी आणि जिंजीवरून अन्नधान्य आणण्यासाठी मोरोपंत पिंगळे यांचे धाकटे बंधू केशव त्रंबक पिंगळे यांना वीस हजारांची फौज घेऊन पाठवले होते.

सत्तर वर्षांचे केशव त्र्यंबक पिंगळे जाताजाता राजांना म्हणाले की, “अन्नधान्य देण्यासाठी हरजीराजांनी विरोध केला तर काय करायचे ?”

त्यावर शंभूराजे म्हणाले,” काका आम्ही तुम्हाला स्पष्टीकरण काय द्यावं? तुम्ही शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा देवुन काम केलेली अनुभवी बुजुर्ग मंडळी आहात. तुम्हाला आणखी काय सांगावे? तुम्ही लगेच रवाना व्हा. ‘दुष्काळात अडकलेली स्वराज्यातील माणसे, तुम्हाला वाचवायची आहेत. शिवाजी महाराजांच्या सोबत्याला शोभेल, ते सर्व तुमचा अनुभव लावून करा.

केशव त्र्यंबक पिंगळे यांच्यासोबत संताजी घोरपडे हे सुद्धा जिंजीला रवाना झाले. केशव त्र्यंबक पिंगळे हे जिंजीला गेल्यावर, हरजीराजे महाडीक यांच्यावर दबाव आला. ते काहीच करू शकले नाहीत.

जिंजीवरून केशव काकांनी संभाजी राजांना पत्र पाठवले होते. त्यात त्यांनी असे लिहले की, हरजीराजे काबूत आहेत.

त्यांच्या गर्वाला लगाम लावण्यात आम्ही यशस्वी झालो आहे. यापुढे इकडून अन्नधान्याचा पुरवठा तिकडे कायम कसा चालू राहील, याची आम्ही काळजी घेतच आहोत .तुम्ही काळजी करू नका.

ते पत्र वाचुन राजांना समाधान वाटले .


त्यानंतर काही दिवसांनी रायगडावरून बातमी आली की, हरजीराजांनी तीन हजार बैलांच्या पाठीवरून अन्नधान्य रायगडाकडे रवाना केलं आहे. ही बातमी ऐकल्यावर शंभूराजे खूप खुश झाले.


त्यानंतर काही दिवसांनी कृष्णाजी कान्हेरे धावत शंभूराजे आणि कवि कलशांकडे आले.आपल्या खांद्यावरचे उपरणे झटकन टाकून ते म्हणाले खलिता आलाय परंतु बातमी चांगली नाही.


जिंजीकडून आलेली धान्याची रसद बादशहाच्या तळावर जाऊन पोहचली. परंतु केशव त्र्यंबक पिंगळे पंतांनी कळवले होते की बहुतेक वाट चुकुन बैलांच्या गाड्या बादशहाच्या तळावर गेल्या असाव्यात. यावर संभाजी महाराजांनी काहीच प्रतिक्रिया व्यक्त नाही. मात्र दिवसांनी जिंजीवरून पत्र आले. त्यात असे लिहलेले “धान्य वेळेवर पोहचले कि नाही हे लगेच कळवा”, असे लिहले होते.


गोंधळलेल्या कविकलशांनी लगेच विचारले की,” राजन, या घटनेमध्ये नेमके चुकले कोणाचे? बैलांचे कि माणसांचे!”, यावर खिन्नपणे हसत शंभूराजांनी प्रश्न केला,” कविराज, तीन हजार बैलांबरोबर किती किती बैल हाकणारे आले असतील? फक्त पन्नास किंवा साठ जण असतील.”
“हो राजे,”
“मग त्याचा दोष चार पायांच्या मुक्या जनावरांना का द्यायचा ? दोन पायाच्या माणसाच्या मेंदूतून निघालेल्या ह्या साऱ्या खोड्या आहेत.हरजीराजे महाडिक यांचा औरंगजेबाला छुपा पाठिंबा होता.त्यांना दोन्ही बाजूंनी आपले संरक्षण करायचे होते म्हणजे औरंगजेब बादशहा विजयी ठरला तरी त्याला मदत केली म्हणून तो काहीच करणार नाही. आणि दुसरी बाजू म्हणजे संभाजी राजेंनी जरी औरंगजेबाला पराभूत केले तरी पण ते सुरक्षित राहतील.”

छत्रपती संभाजी महाराजांना मोघलांनी पकडल्यावर हरजीराजे महाडिक यांनी संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता. परंतु त्यांनी तसे न करता केसो त्र्यंबक पिंगळे यांनाच अटक केली.

विश्वास पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे हरजीराजे महाडीक यांनी फितुरी केली असावी पण इतिहासात एका नोंदीला सत्य मानायचे असेल तर कमीतकमी एकाच गोष्टीचे तीन पुरावे नोंदीच्या स्वरूपात असायला हव्यात. असो स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत काय दाखवतात ते पाहुयात!

मालिकेत पाहून हे सिद्ध झाले आहे की, हरजीराजे महाडीक यांनी फितुरी केली नव्हती.केसो त्रिमल यांनी त्यांना कटात अडकविण्याचा प्रयत्न केला होता. हरजीराजे महाडीक यांना मानाचा मुजरा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!

Exploring the exquisite jewelry collections at Rajmudra Official is a delightful experience for any enthusiast. After indulging in the beauty of fine craftsmanship, why not add some excitement by visiting vavada зеркало? Whether you're looking to unwind after a day of shopping or seeking some thrilling entertainment, vavada зеркало offers a unique and exhilarating gaming experience to enjoy in your free time.