महाराणी येसूबाईंचा संभाजी महाराजांना पकडल्यानंतरचा इतिहास-०१

छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यात एक व्यक्तिमत्व खूप काळापासून दुर्लक्षित राहिले होते.

स्वराज्य रक्षक संभाजी या झी टीव्हीवरील मालिकेमुळे सर्वांच्या समोर आले. ते सुविद्य, सुसंस्कृत, कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्त्व म्हणजे छत्रपती शिवरायांची थोरली सून आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी, महाराणी येसूबाई होय.

आपल्याला सर्वांनाच महाराणी येसूबाईंचा इतिहास मालिकेद्वारे माहित झालेलाच आहे.

आता सर्वांपुढे एकच प्रश्न आहे तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराज मोगलांच्या कैदेत अडकल्यावर महाराणी येसूबाईंचे काय झाले?

हे सर्व माहिती देण्याच्या आगोदर, मला एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते. ती म्हणजे जेव्हा, छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले, त्यावेळी महाराणी येसूबाई या रायगडावर होत्या. त्या संभाजी महाराजांबरोबर संगमेश्वरला नव्हत्या.

बऱ्याच इतिहासकारांनी हे चुकीचे लिहून ठेवलेलं आहे की, येसूबाई राणीसाहेब संगमेश्वरला युवराज शाहूंबरोबर होत्या? हे खोटे आहे.


आता आपण आपल्या मूळ विषयावर येउयात. जेव्हा संताजी घोरपडे व खंडो बल्लाळ संगमेश्वरातून रायगडी येतात तेव्हा ते महाराणी येसूबाईंना हि दुःखद बातमी सांगतात. विचार करा काय परीस्थिती आली असेल या श्री वर? पण; छत्रपती संभाजी महाराजांना विश्वास होता की, ही येसूबाईं इतकी खंबीर आहे कि,आपण नसताना सुद्दा स्वराज्य अबाधित ठेवण्याचे सामर्थ्य येसूबाईंच्या अंगात आहे.

आणि झालेही असेच .

१७८९ ते १७३१ या कालावधीत महाराणी येसूबाईंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुनेस शोभेल असे कार्य केले.

आणि हेच कार्य आज मी या लेखातून तुम्हाला सांगत आहे त्यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो.

आपण सर्वांनी आमच्या राजमुद्रा चॅनेलला दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार .


प्रकरण १. रायगडचा पाडाव आणि येसूबाईराणींचा धीरदात्तपणा

मार्च १६८९ नंतर, महाराणी येसूबाईंच्या जीवनात खरा कसोटीचा क्षण आला. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर खूप मोठे संकट त्यांच्यावर कोसळले. मोगल सरदार इतिकादखान उर्फ झुल्फिकारखान याने स्वराज्याची राजधानी रायगडाला वेढा घातला होता. रायगडावर असणारे सर्व राजकुटूंबच कैद करण्याचा औरंगजेबाचा डाव होता. यावेळी रायगडावर महाराणी येसूबाई, शाहूराजे, राजाराम महाराज, ताराबाई, सकवारबाई राणीसाहेब आणि इतर परिवार होता.

पुढे नेमके काय करायचे ? मराठा साम्राज्य कसे चालवायचे? तसेच यापुढील मसलत काय ठरवायची? असे प्रश्न सर्वांना भेडसावत होते.रिकाम्या झालेल्या छत्रपतींच्या गादीवर संभाजी महाराजांचे पुत्र युवराज शाहूस बसवून राज्याची सर्व सुत्रे महाराणी येसूबाई आपल्या हाती घेतील असे सर्वांनाच  वाटत होते. परंतु मराठ्यांच्या या राणीने वेगळीच मसलत सांगून सर्वांना धक्का दिला.

आपल्या पुत्रास गादीवर न बसवता आपल्या दिरास म्हणजे राजाराम महाराजांस गादीवर बसवून त्यांना छत्रपती म्हणून जाहीर केले आणि राजाराम महाराज स्वराज्याचे तिसरे छत्रपती झाले.आपल्या पुत्रास “छत्रपती” न बनवता आपल्या दिरास राजाचे सिंहासन अर्पण करून महाराणी येसूबाईंनी मराठ्यांच्या इतिहासात नि:स्वार्थीपणाचा व त्यागाचा एक खूप मोठा आदर्श निर्माण केला.

एक अण्णाजी दत्तोला हत्तीच्या खाली दिले तरी स्वराज्यात अजून खूप अण्णाजी दत्तो शिल्ल्लक होते हे महाराणी येसूबाईंना माहित होते. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!