स्टार प्रवाह वरील “लग्नाची बेडी” ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. त्यामुळे या मालिकेतील सगळ्याच पातळ्यांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतायेत. नुकताच या मालिकेत भूमिका साकारणाऱ्या एका कलाकारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर हा कलाकार आहे मालिकेत रत्नाकर रत्नपारखी ची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद अधिकारी.

काही दिवसांपूर्वीच मिलिंद यांच्या मोठ्या भावा समान असणाऱ्या मित्राचं दुःखद निधन झाले आहे. मित्राच्या आठवणीत भाव पोस्ट शेअर करत त्यांनी म्हटलंय जन्माला आलेल्या प्रत्येकालाच मरण चुकत नाही,हे माहीत असलं तरीही अत्यंत जवळच्या व्यक्तीचा मृत्यू पचवणं प्रचंड अवघड असतं.

माझा जवळचा मित्र नव्हे मोठा भाऊ आणि त्यापेक्षाही बरच काही होतास रे,विजय तू आता परत कधी दिसणार नाहीस. तुझ्याशी परत कधीही बोलता येणार नाही ही कल्पनाच सहन होत नाही रे खूप लवकर साथ सोडून गेलास रे. अशी भाऊपूर्ण पोस्ट मिलिंद यांनी share केली आहे. भावा समान मित्राच्या अशा अचानक जाण्याने मिलिंद हे खूपच भाऊक झाले आहेत.आपल्या rajmudraofficial परिवारातर्फे त्यांचा मित्र विजय यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐.