छ. शिवाजी महाराज- the great Engineer

खडक फोडण्याच्या या भन्नाट युक्तीचा शोध छत्रपती शिवाजी महाराजांनी लावला.

मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज हे असामान्य असे चौसष्ठ पैलू व्यक्तिमत्त्व होते. आजच्या लेखातून आपण त्यांच्या बुद्धितील एक अचाट गुण जाणून घेऊयात.

शिवमित्रांनो, आपण सर्वांनीच आयुष्यात कमीत कमी एक तरी किल्ला नक्कीच पाहिला असेल. त्या किल्ल्यावर तुम्ही निरीक्षण केले का? गडकिल्ल्यां वर आपल्याला पाण्याची टाकी आयताकृती- चौकोनी कोरलेली दिसतात आणि बुरुजाचे दगड चोकोनी च दिसतात ते या तंत्रज्ञाना मुळे.कित्येक ठिकाणी तुम्हास सारख्या, चौरस आकाराचे दगड पाहिले असतील. आणि आश्चर्य म्हणजे प्रत्येक दगड खूप तंतोतंत आकाराचा असेल.

या मागे छत्रपती शिवाजी महाराजांची एक भन्नाट युक्ती होती. हे दगड जे आहेत ते डोंगरापासून बनवले जायचे. त्याकाळी आजच्या सारखी यंत्र नव्हती की, ज्यामुळे तंतोतंत दगड तुटून आपल्याला हव्या त्या आकाराचे दगड मिळणार!

शिवमित्रांनो, त्याकाळी गडांवरील खडकावर एका रेषेत छिद्रे पाडले जायचे व त्या छिद्रांमध्ये सुके सागवानी लाकडे (खुंटी) घुसवली जायची, त्या लाकडाला वरून पाणी देत जायचे. एक आठवड्यात लाकूड फुगून खडक फुटतो आणि आपल्याला पाहिजे त्या आकारात खड्डा मिळतो..यातील बाहेर काढलेले दगड सुद्धा तुकडे तुकडे न होता
चांगल्या स्थितीत आणि आकारात मिळतात.

त्या काळात दगड फोडण्यासाठी दारूगोळा उपलब्ध होता. तरी छत्रपती शिवाजी महाराज पर्यावरण पूरक मार्ग वापरायचे. ही पद्धत जर वापरली नसती तर, बुरुज बांधायला लागणारे चिरे खालून वर चढवावे लागले असते. त्यामुळे कमी वेळेत, कमी सहित्यानिशी, कमी पैसा , कमी मनुष्यबळ वापरून शिवाजी महाराजांनी गडदुर्ग बांधले.

छत्रपती शिवाजी महाराज हे खूप महान इंजिनीअर होते.

मित्रांनो, संपूर्ण शिवचरित्र फ्री मध्ये वाचण्यासाठी या लिंकवर जा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!