मागच्या भागात आपण संताजी घोरपडे यांच्या शिवकाळातील योगदानाबद्दल जाणून घेतले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांच्या काळात संताजी घोरपडे यांच्या योगदानाबद्दल दुर्देवाने इतिहासात नोंदी आढळत नाही.
फक्त संगमेश्वर जवळ शेख निजाम याने संभाजी महाराजांना कैद केले त्या प्रसंगात संताजी घोरपडे हे राजसोबतच होते अशी नोंद आढळते.त्यानंतर खरा संताजी घोरपडेंच्या इतिहासाला सुरवात झाली.संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला संताजी घोरपडे यांनी घेतला.
१.१६८९ मध्ये स्वराज्यावरील महान संकट
विशाळगडाहून रायगडाकडे येत असता संगमेश्वर मुक्कामी छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले, ही वार्ता समस्त महाराष्ट्राला धक्का देणारी ठरली.
मरातबांच्या हिंदवी स्वराज्यावर कोसळणाऱ्या संकटांची जणू मालिकाच आता सुरू झाली. राजधानी रायगडावर जेव्हा ही वार्ता येऊन धडकली असेल, तेव्हा किती हाहाकार उडाला असेल,याची आपण कल्पनाही करू शकत नाही.
मराठ्यांचे पहिले छत्रपती आग्यासमोगली बादशाहीच्या गुहेत जाऊनही अदभुतरीत्या महाराष्ट्रात परत आले. पण त्यांचेच पुत्र स्वराज्यातीलच प्रदेशात फितुरीमुळे पकडला गेले.हे किती दुर्दैवी होय!
संगमेश्वराहून संभाजी महाराज व कवि कलश यांना घेऊन शेख निजाम एवजया वेगाने त्या प्रदेशातून बाहेर पडला की, विशाळगडाच्या परिसरातील मराठी मुलखातील लोकांना त्याची बातमीही मिळू शकली नाही.
परिणामी, कोणी मराठी लष्कराने शेख निजामाचा पाठलाग
करण्यापूर्वीच तो या राजबंद्यांसह औरंगजेब बादशहाच्या समोर हजर झाला. मोगली छावणीतील संभाजीराजांचे भवितव्य हे जवळजवळ ठरल्यासारखे होते. ते आता जिवंत राहणे, ही गोष्ट असंभवनीय होती.
अशा प्रकारे संपूर्ण मराठी राज्यावरच मोठा विकट प्रसंग आला होता. संभाजी महाराजांची राणी येसूबाई यांच्यावर तर आकाशाची वीजच कोसळली होती; पण अशाही परिस्थितीत शिवरायांच्या या सुनेने विलक्षण मनोपर्व दाखविले.
वैयक्तिक दुख बाजूला ठेवून संभाजी महाराजांच्या कैदेने निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी येसूबाईनी रायगडावरील राजकारणापी सूत्रे हाती घेतली.
त्यांनी पहिली महत्त्वाची गोष्ठ ही केली,रायगडाचा किल्लेदार यांमोजी काटकर यास हाताशी धरून त्यांनी राजाराम महाराजांचे मंचकारोहण केले आणि त्यांना हिंदवी स्वराज्याचा प्रमुख म्हणून, छत्रपती म्हणून घोषित केले.
त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र शाहूराजे यांचे वय सात वर्षांचे होते. राजाराम महाराजांचे वय एकोणीस वर्षांचे होते.
अशा वेळी शहराजांस छत्रपती म्हणून घोषित करून राज्याची सर्व सूत्रे आपल्या हाती येसूबाईना घेता आली असती; पण तसे न करता राज्याचे हित नजरेसमोर ठेवून अत्यंत निस्वार्थीपणे त्यांनी आपणहून पुढाकार घेऊन राजाराम महाराजांच्या हाती राज्याची सूत्रे दिली.
२.रायगडावरील राजकारणी मसलत
राजाराम महाराजांच्या मंचकारोहन झाल्यानंतर एक महिन्याने ११ मार्च १६८९ रोजी तिकडे बादशाहा छावणीत संभाजी महाराजांची हालहाल करून हत्या करण्यात आली. सर्व महाराष्ट्र या घटनेने थरारून गेला.
बादशाही छावणीत आनंदोत्सव साजरा होत असताना महाराष्ट्राच्या भूमीवर मात्र निराशेचा अंधकार पसरत होता.
अशा परिस्थितीत राजधानी रायगडावर स्वराज्यातील प्रमुख मातब्बर मंडळी जमू लागली होती. त्यामध्ये प्रल्हाद निराजी, रामचंद्रपंत, शंकराजी नारायण, निळो मोरेश्वर, जनार्दनपंत हमनी, राहुजी सोमनाथ, खंडोबल्लाळ हे प्रमुख मुत्सदी, तर संताजी घोरपडे, धनाजी जाधव, मानाजी मोरे, हंबीरराव मोहिते सरलष्कर दुसरे’, रूपाजी भोसले, बहिर्जी घोरपडे, मालोजी घोरपडे, विठोजी चव्हाण हे प्रमुख सेनानी यांचा समावेश होता.
राजघराण्यातील देशव्यक्ती म्हणून राणी येसूबाईकडे सर्व जण मार्गदर्शक देवता म्हणून पाहात होते.
रायगडावर जमलेल्या सर्व सेनानींना महारानी येसूबाईंनी सांगितले की, रायगडावर सर्वांनी एकत्र राहणे धोक्याचे आहे.
आम्ही स्वतः शाहू राजांसह रायगडावर लढतो.तसेच राजाराम महाराजांनी प्रमुख मंडळीसह गडाबाहेर पडावे व जिंजीस जावे. आणि राजाराम महाराज जिंजीस पोहचतील तेव्हा त्यांनी तिथे जाऊन संघर्ष चालू ठेवावा. महाराणी येसूबाईची ही गसलत सर्वांना मान्य झाली.
३.संताजीचा प्रमुख नेता म्हणून उदय
दरम्यान औरंगजेब बादशहाने वजीर असदखानाचा पुत्र
एतिकादखान उर्फ झुल्फिकारखान यास रायगडास वेढा घालून मराठयांचे संपूर्ण राजघराणेच कैद करण्यासाठी रवाना केले होते.खानाने बादशाही आज्ञेनुसार गडास वेढा घालण्याचे काम हाती घेतले होते. हा वेढा अधिक कडक होण्यापूर्वीच राजाराम महाराजांनी गडाबाहेर पडणे आवश्यक होते.
त्याप्रमाणे येसूबाई व शाहूराजे यांचा निरोप घेऊन ते रायगडाबाहेर पडले. त्यांच्यासोबत ताराबाई व राजसबाई या त्यांच्या राण्याच प्रसाद निराजी,संताजी व धनाजी ही राज्यातील प्रमुख मंडळीही होती – (१ एप्रिल, १६८९).
येथून पुढे राजाराम महाराजांची कारकीर्द सुरु होते व त्याचबरोबर संताजी घोरपडेचेही खरे कर्तव्य राल होते. आतापर्यंत संताजी हा राज्यातील दुय्यम स्थानावरील लष्करी अधिकारी मानले जात होते.
आता राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत ते प्रल्हाद निराजी, रामचंद्रपंत, शंकराजी नारायण यांसारख्या प्रथम श्रेणीच्या अधिकार्यात गणले जाउ लागले.
म्हालोजी घोरपड़े रणांगणी पडल्यावर घोरपडे घराण्यातील
ज्येष्ठत्वाचा वारसा संताजीकडेच चालत आला होता आणि दुसरे असे की, संभाजीराजांच्या हत्येने निर्माण झालेल्या असाधारण परिस्थितीत संताजीसारख्या पराक्रमी पुरुषास आपल्या अंगीचे गुण दाखविण्यास खूप मोठी संधी प्राप्त झाली होती.
राष्ट्र संकटात असता प्रतिकूल परिस्थितीतही जो पुरुषार्थ दाखवितो व आपल्या कर्तुत्वाने राष्ट्र वाचवतो त्याचेच नाव अल्पावधीत सर्वतोमुखी होते.
४.बादशाही मावणीचे कळस कापले!
रायगडाहून राजाराम महाराज प्रथम प्रतापगडास आले. ते
राजधानीबाहेर पडल्याची बातमी मोगलांना समजताच त्यांनी तिकडे धाव घेऊन प्रतापगडास वेढा दिला.
तेव्हा गुपचुपपणे राजाराम महाराज वासोटा-सातारा- परजी असे मुक्काम करीत पन्हाळ्यास आले – (ऑगस्ट१६८९). राजाराम महाराज ज्या गडावर जात तिकडे मोगली फौजा त्यांना पकडण्यासाठी धावत. आता त्यांनी पन्हाळ्यासही वेढा दिला.
स्वराज्यातील इतर गडांनाही वेढे पडले होते. त्यांपैकी अनेक मोगलांच्या ताब्यात गेले होते. काही अद्यापही मोगलांशी झगड़त होते.
किल्लेदार व ठानेदार यांनी घाबरून न जाता मोगलांशी दोन हात करावेत, म्हणून राजाराम महाराज त्यांचे नीति धैर्य वाढवीत होते; पण मोगली आक्रमणाची लाट एव्हढी जबरदस्त होती की, मराठयांचे हे सर्व प्रयत्न निष्फळ होत होते.
अशा वेळी रणांगणावरील आपल्या भीम पराक्रमाने संताजी धनाजी यांनी सामान्य मराठयांचे नीतीधैर्य वाढविण्याचा महान प्रयत्न केला.
छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केल्यापासून औरंगजेब बादशहा भीमा नदीकाठी, कोरेगाव (तुळापूर) येथे छावणी करून होता आणि तेथून तो महाराष्ट्रातील गडकोट घेण्यासाठी मोहिमा पाठवीत होता.
या बादशहाच्या छावणीवरच हल्ला चढवावा आणि मोगली आक्रमणाचे
केंद्रस्थानच धास्तावून टाकावे, अशी अचाट कल्पना संताजी आणि धनाजी यांना सुचली.
त्याप्रमाणे त्यांनी आपल्या फौजा गोळा केल्या व ते संभू महादेवाच्या डोंगराकडे आले. तेथे ठरले की, बादशाही छावणीवर
संताजींनी हल्ला करायचा व त्याचवेळी फलटण-बारामती भागात रणमस्तखान व शहाबुद्दीन या खानाचा समाचार
घेण्यासाठी धनाजीने संताजीच्या मदतीस विठोजी चव्हाण दुसराशूर सेनानी व दोन हजार स्वार दिले.
याशिवाय संताजीचे बहिर्जी वमालोजी हे दोन बंधु सोबत होते.