छत्रपती संभाजी महाराजांचा गोवा मोहिमेवरील पराक्रम-१

बिमारीने त्रस्त झालेला माणूस लवकरच तंदुरुस्त व्हावा, उठून कामाला लागावा, तसे औरंगजेबाचे झाले होते. अपयशाच्या डागण्या, नैराश्य यातून तो बाहेर आला. पासष्टीमध्ये कंबर कसून त्याने पुन्हा तडफेने कामाला सुरुवात केली. त्याच्या ह्या नव्या टवटवीने त्याचे सरदार, , पोते सारे चक्रावून गेले. असदखान इतरांना खाजगीमध्ये अभिमानाने सांगत होता, “आलमगीरांना “काम, काम’ आणि काम’ हेच
अखंड व्यसन आहे.”

आलमगीर मोठ्या मोहिमेवर आपूनही त्यांना, आपल्या अवाढव्य सल्तनतच्या
एखाद्या कोपऱ्यात कोठे, काय नि कसे घडते आहे याची पूर्ण कल्पना असायची.
अलीकडे फौजदार बलोचखान याचा खुला अबुमहंमद पातशहांच्या महालामध्ये
अनेकदा दिसायचा. त्या तेविशीतल्या पोराची पातशहासोबतची वाढती ऊठबस हा
इतरांसाठी आश्चर्याचा विषय बनला होता.

त्या दिवशी अबुमहंमदला पातशहाने मुद्दाम आपल्या खाजगी सदरेवर बोलावून घेतले. त्याचे इतर सर्व मोजके सरदार, अंमलदार तेथे उपस्थित होतेच.
उघड तारीफ हे आलमगीरसाहेबांच्या शिस्तीत बसणारे नव्हते. पण त्या दिवशी अबुमहंमदची त्यांनी चालवलेली उघड प्रशंसा पाहून सारे ज्येष्ठ सरदार चमकले.आपल्या शहजाद्याकडे, मुअज्ममकडे नजर वळवत शहेनशहा खुषीने बोलला,
“शहजादे, ह्या छोऱ्याची कच्ची उमर बघू नका. त्याची करतूद बघा.”

शहेनशहाने नजरेचा इशारा करताच अबुमहंमदने आपल्या काखोटीच्या
नकाशाची गुंडाळी उघडली, आणि ती समोरच्या बेठकोवर पसरली. तो संपूर्ण सह्याद्री पर्वताचा मोठा खुलासेवार नकाशा बघून सर्वांचेच डोळे दिपले.

पातशहा खुषीने विचारू लागला, “बेटे अबू, सांग सारी हकीगत ह्या
पर्वतरांगांची.”

“जहाँपन्हाँ, हा सह्याद्री पर्वत काटेरी जंगलांचा, बोरीबाभळी, सराट्यांनी भरलेला आहे. इथे खूप खतरनाक पहाडी, खोल दऱ्या आणि मोठमोठ्या घळ्या आहेत.”

“एकूण किती वाटा? किती घाट?” पातशहाने नेमका प्रश्न केला.

“जहापन्हा, सह्याद्रीतले निबिड घाटमाथे पार करण्यासाठी एकूण तीनशेसाठ छोटे रास्ते आहेत. पैकी पासष्ट मार्गांनी हत्ती, उंट असे प्राणी घेऊन सफरे करता येते.”

“आणि उरलेल्या रानवाटा?”

“त्या खूपच अरुंद आणि अत्यंत खतरनाक आहेत. तेथून वावरताना वाघसुद्धा डरतात.”

आली पवते हं सर्वांना खूप कौतुक वाटले. साऱ्यांच्याच दिलातला प्रश्न
न मुखातून बाहेर पडला, “बेटे, इतक्या बारीकसारीक गोष्टींचं ग्यान तू
कसं हासिल केलंस?”

“हजरत, पहाड आणि नद्यांची सफर करायचा मला बचपनापासूनचा षोक आहे. इकडच्या पर्वतरांगा बघायच्या इराद्याने व वर्षांमागं मी उत्तरेतून इकडं आलो. अनेक फकिरांच्या आणि गोसावी बैराग्यांच्याही | मी इथल्या पर्वतरांगा छान मारल्या.
बनवला आहे मुशाफिरांना उपयोगी पडावा, याच इराद्यानं मी हा नक्शा
बनवला आहे.”

औरंगजेबाने हळूच आपल्याजवळचे कच्चे नकाशे बाहेर काढले. त्यांचे बारकाईने निरीक्षण केले व अबुमहंमदच्या नकाशातील काही संदर्भाच्या चुकांवर त्याने नेमके बोट ठेवले, तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. पातशहाने अबुला खिलतीची पोशाख आणि
हिरेजवाहारात देऊन त्याचा सत्कार केला.

त्याच वेळी पातशहाने वजिराला सांगितले की,

“याच दिशेने अधिक कोशीस करा. सह्याद्रीतल्या उंच कडेकपारीत राहणारे, त्या इलाख्य़ाची माहिती असणारे चांगले वाटाडे शोधा. पर्बत झपाट्यानं चढू शकणाऱ्या कडव्या जंगली लोकांची आपल्या फौजेत भरती करा. त्यासाठी त्यांना मुहमांगा मुआवजा घा.”

संभाजीराजांच्या शहाला काटशह देण्याचा आणि अंती राजांनाच दंडाबेड्या घालण्याचा विडाच आलमगीरांनी आता उचलला होता. दररोजचा रत्नजडित किमाँश त्याच्या डोक्यावर नव्हता. त्याचे मस्तक आज किती भुंडे, काहीसे कळाहीन दिसत होते. प्रतिज्ञा पूर्ण करायचा पातशहाने मनोमन निर्धारच केला होता जणू. औरंगजेब
आपल्या सरदारांना म्हणाला,

“झुल्फिकार, तो संभा आपल्या फोजांसह गोव्याकडं सरकतो आहे. पोर्तुगीजांना अंगावर घ्यायचा त्याचा पक्का इरादा असल्याची खबर आम्हांला मिळाली आहे.”

“त्या अव्वल फिरंगी तोफांच्या धमाक्यापुढे आपण टिकू अशी समजूत आहे की काय त्या बेट्याची?” असदखानाने हसत विचारले.

वजिराच्या टिपणीवर बाकीचे सरदार हसले. पण पातशहा अधिक गंभीर दिसला.आपल्या शत्रूच्या हिमतीचा आणि ताकदीचा ताला जगा जणू अंदाज होता. महणून नच त्याने अनेक रात्री पलिते आणि हलाल जाळून एक क्या योजना बनवली होती. त्या योजनेचा आराखडा आपल्या बहादूर संहकाऱ्यांपुढे खुला करत पातशहा बोलला,
“संभाने पोर्तुगीजांशी बिघाड केला आहे. त्याचा एक पाय त्या फिरंग्यांच्या जबड्यात गुंतला आहे. तोवर आम्ही त्याला दुसरीकडून हेराण करून सोडू.

आमचा एक गाझी चाळीस-पन्नास हजारांची फौज घेऊन इकडून निघेल. कोल्हापूर, बेळगाव मार्गाने हा रामदऱ्याचा घाट उतरून दक्षिण बोकणात तावून जाईल.

“लेकिन हजर” असदखानाने अर्धवट तोंड उघडले.

“-हां.. बोलो वजीर?”

“एवढ्या मोठ्या फौजेला तिकडे घासदाणा कसा मिळणार? रसदेची कोण तरतूद करणार?”

“वाह! असदखान आपली ही शंका शहेनशहाच्या वजिराला शोभेल अशीच आहे. परंतु त्याचाही मनसुबा आम्ही करून ठेवला आहे. आमचा सुरतेचा सुभेदार गुजरातच्या किनाऱ्यावरून रसदेनं भरलेली गलबतं पाठवून देईल. गलबतांचा हा तांडा अरबी समुद्रातून मुंबई, जंजिरा, राजापूरमार्गे पणजीकडे सरकेल.”

“पण जहाँपन्हाँ, दर्याकिनारी शिवाजी-संभाजीने बांधलेले जलदुर्ग आणि खाड्यां– वरची आरमारी ठाणी आहेत!”

“त्यांना तोंड देण्याइतपत आमचं आरमार ताकदवान नक्कीच आहे. शिवाय पोर्तुगीजांनाही आमच्या मदतीला धावण्यावाचून दुसरा चारा नाही.”

पातशहाची ती योजना बया बुढ्ध्या अनुभवी सरदारांनी ऐकली. त्यांनी माना डोलावल्या, पण झुल्फिकार कोरडे उसासे टाकू लागला. शहेनशहाने त्याचे बावरे नयन पकडले.

«“बोलो…झुल्फिकारखान, काय आहे तुझा झा शक?”

“खाविंद, आपला मनसुबा बुलंद आहे. पण रामदरा अगर गोव्याकडे आपल्या फौजा घुसल्या की, तो संभा सरळ इकडून घाईने निघून रायगडाच्या आपल्या पाषाणी बिळामध्ये पळून जाईल, त्याचं काय?”

पातशहा बारीकसा हसत, नकाशाकडे बोट दाखवत सांगू लागला, “जेव्हा इकडे गोव्याकडे आमची एक बलाढ्य फौज घुसेल, तेव्हाच आमचा एक गाजी आपली दुसरी फोज घेऊन कल्याण-पनवेलकडून झपाट्याने रायगडाकडे निघेल. दोन्ही फौजा इथे
महाड-निजामपूरच्या बाजूला एकं होतील.

पुऱ्या ताकदीने मिळून रायगडाकडे धाव घेतील आणि त्या काफराच्या पत्थराच्या राजधानीला बारूद लावून त्यांना त्यांच्या नापाक तख्तासकट खाली खेचतील.” जाळेपेरणीने , त्याची या त्या हुकमी, काटेरी जाळेपेरणीने त्याचे सर्व अंमलदार अवाक्‌ झाले.
त्याची तारीफ करू लागले. तेव्हा पातशहा बोलला, “इतक्यात एवढे हुरळूने जाऊ नका. जाणीवपूर्वक लक्ष द्या. ह्या दोन्ही फौजा ठरल्या वेळेत एकत्र आल्या, तरच ही योजना फतेह .नही तो कुछ नही पावोगे—”

सर्व सरदार, अंमलदार अत्यंत गंभीर नजरेने पातशहाच्या निर्धारी चर्येकडे पाहु लागले. तेव्हा पातशहा त्यांना म्हणाला, “एकदा ह्या दोन्ही फौजा एक झाल्या की, और एक चाल चलूंगा. ये देखो, कोकणात ठिकठिकाणी खाली उतरणारे खतरनाक घावहा बोरघाट, हो कावल्याचा, हा वरंदघाट, हा पलीकडचा आंबा घाट. जर वेळेत
दोन्ही फौजा एकवटल्या तया, तरच मी ह्या घाटांतून आणखी दहा-दहा हजारांच्या फौजा खाली उतरवेन.

त्या सर्व मिळून संपूर्ण कोकणाला निखाऱ्यावरल्या मछलीसारख्य़ा भाजून न काढतील. पण थोडा जरी वेग कमी पडला, तरी सह्याद्रीच्या ह्या घाटीमध्ये एका आमची सर्व फौज बुडेल. पूछो क्यूं?”

“क्यूं जहापन्हा-?”

“आमचा जोर कमी झाल्याचा, लुळा पडल्याचा थोडासा जरी अंदाज आला तरी ह्या जंगलरानातली सारी माणसे काठ्या-कुल्हाडी घेऊन बाहेर पडतील. वाटेत, आडवाटेत्‌ गान आमच्या लष्कराला खूब बदडायला तिथे औरत लोग आणि बालबच्वेही मागेपुढे पाहणार नाहीत. कारण हा सारा मुलूखच त्या शिवावर आणि
संभावरही दिलोजानसे मुहब्बत करतो.”

पातशहाला पुढचे सारे निर्णय तातडीने घ्यायचे होते. दक्षिण कोकणच्या त्या फळीची सूत्रे कोणाच्या हाती द्यायची, याबाबत पातशहाने सर्वांना विचारले. तेव्हा सर्वांच्याच तोंडून बड्या शहजाद्याचे, मुअज्ञमचे नाव पुढे झाले. मुअज्जम उंच शरीरयष्टीचा, मर्दानी सौंदर्याचा, किनऱ्या पण लोभस आवाजाचा होता. एक कुशाग्रबुद्धीचा वदा शहजादा म्हणून सारे त्याच्याकडे आदराने बघायचे. त्याची उमरपॅचेचाळीस वर्षांची होती.

मुअज्जमच्या एकमुखी निवडीने पातशहा चमकला, पण तेही क्षणभरच. त्याच बैठकीत मुअज्जञमबरोबर कोणाकोणाला पाठवायचे हे नक्की झाले. दुखलासखान,लतीफशहा दखनी कधी तोफखान्याचा दारोगा आतिशखान अशी शहेनशाठान नशहाने एक एक नावे घेतली. त्याबरोबर ते ते सरदार उठून कुर्निसात करत उभे राहिले.

त्यानंतर औरंगजेबाने “नेक मराठा नागोजी माने म्हसवडकर” असे नाव घेतले. त्या बरोबर सहा फुटी उंच, धटाकट्टा नागोजी उठून उभा राहिला.

नागोर्जीकडे पाहात औरंगजेब अभिमानाने बोलला, “बेटे मुअखज्जम5, एक ध्यानात ठेव. महाराष्ट्रात अशी काही उच्चकुलीन, नेक, जातिवंत, प्रामाणिक मराठा घराणी आहेत, जी आदिलशहाशी, निजामशहाशी असोत वा आम्हा तुर्कमोगलांशी असोत, नेहमीच अत्यंत वफादार राहिली. ज्यांनी शिवा आणि संभासारख्या बगावतखोर
जमीनदार बापलेकांना कधीच राजा मानलं नाही. अशा इमानी कुळांपैकी नागोजी एक आहे. भविष्यातसुद्धा हा सच्या आदमी तश च्या मिढा च्या मिठाला जागणारा आहे!”

कल्याण-पनवेलकडच्या आघाडीचा सेनानायक कोण सा. प्रश्न पातशहाने विचारला, तेव्हा ती धुरा आपल्याच हातामध्ये पडावी ह्या अभि झुल्फिकारखान उठून उभा राहिला. पण त्याच्या आक्रमक वारूला लगाम लावत औरंगजेब बोलला, “झुल्फि.. बेटा, तू वयानं लहान आणि नात्यानं माझा मावसभाऊ आहेस.

मे तुझे नाउमीद करना नही चाहता, पण मला तिकडून उतरणारा योद्धा फक्त धाडसी नको, उलट्या कलेजाचाही हवा. तिकडे दुश्मनांची डोकी आणि मंदिरांचे कळस तोडणारा इस्लामचा वफादार बंदा मला हवा आहे. म्हणूनच पुरी सोच के साथ मी शहाबुद्दीन उर्फ गाजिउद्दीन फिरोजजंगची निवड करतो.”

“लेकिन जहाँपन्हाँ.., त्यांना रामशेजचा एक नन्हासा किल्लाही जिंकता आला
नाही–” ही चिडून बोलला. |

“झुल्फिकार, काहीं तोफा अशा असतात, त्यांना जसा पेटायला उशीर लागतो,

तसाच बुझायलाही वेळ लागतो.”

उत्तर मोहिमेची सूत्रे हाती घेण्याबाबत शहाबुद्दीनला वाचताना ] द. खलिता लिहिला
गेला. पातशहाने जुन्नरला तळ ठोकून असणाऱ्या शहाबुद्दीनला व

“आपण लागलेच नाणे घाटातून खाली उत्रा. उत्तर कोकणचा मुलूख जाळत निघा. मुअज्जमच्या आणि तुमच्या केचीत संभा सापडायलाच पाहिजे. खबरदारींनं पावले टोका. एक ध्यानात ठेवा. तो संभा म्हणजे वाहता वारा आहे. नंतर मुठीत गवसणं केवळ मकी ररामदरा आणि गोव्याकडे मराठ्यांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी मुअज्जम
ऊर्फ शहाआलम निघणार होता.

त्याची जोरकस तयारी सुरू झाली. त्यातच
रेवदंड्याला आणि चोलला संभाजीच्या फौजेला यश मिळत असल्याची खबर येऊन पोचली. त्याच रात्री मुअज्जमला पातशहाने आपल्या मुक्कामी लावून न घेतले. त्याला
एक महत्त्वाची खबर फक्त मुअज्जमच्याच कानावर घालायची होती. “तो बदमाष काफरबच्वा संभा आजकाल माझ्याशी खिलवाड करतो आहे. त्याने आमच्या शहजादा अकबराला गुप्तपणे खाली गोव्याकडे बांद्याला हलवलं आहे. त्या सर्वांच्या दिलात
काहीतरी काळंबेरं आहे. एकदा रामदऱ्याचा घाट उतरून तू खाली गेलास की, पहिली धाड बांद्यावर घाल. त्या बेवकूफ शहजाद्याला बेड्या ठोक.”

दुसऱ्याच दिवशी सकाळी औरंगजेबाने आपल्या खोजांना, निजी सेवकांना पातशाही सामानसुमान गुंडाळायचा इशारा दिला. तो असदखानाला बोलला, “आता अधिक काळ मला औरंगाबादला डेरा डालून भागणार नाही. मला दुश्मनांच्या आनी मैदाने जंगच्या अधिक नजदीक जायला हवे. आमचा डेरा यापुढे काही दिवसांसाठी
अहमदनगरला पडेल.”

“जहॉपन्हा, तनी जल्दी?”

“वजीरजी, खैर, दोस्त हो या दुश्मन, एक गोष्ट खरी. शिवाच्या ह्या पोरानं आपल्या
एक एक करामतींनी मला बुढाप्यामध्ये जवान बनवलं आहेे…!”

पुढील भाग पाहण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!