बाजींद भाग ३४

चांदीची पेटी आणि परवलीच्या शब्दाने वस्ताद काका कमाल मस्त झाले.
त्यांनी त्वरित सोक्त आनलेल्या इसमाना रायगडी परत जायला सांगितले.

चौकीच्या पहारेकामांना उद्देशून ते बोलते.तुमची ओळख पटली का ?
अोल पटली तर आम्हाला पुढे जायचे आहे .मात्र त्यांना.

भयभीत शब्दात ते बोलले..शिलेदार आमची चांगलीच ओळख पटली,जाव तुम्ही

असे बोलताच सखाराम व त्याचे सहकारी वस्ताद काकासोबत चौकीतून
रायगडाखाली गेलेल्या वाटेने चालू लागले. बराच वेळ निघून गेला तरी,कुणीही कुणाशी बोलत नव्हते.वस्तादकाका कसल्यातरी गंभीर विचारात होरे…

चंदन…..चांदीची पेटी….. परवलीचा शब्द आणि चांदीची पेटी माझ्या
खंडोजीच आहे….यांना कशी भेटली हि पेटी….

वस्ताद काकांनी हमरस्ता सोडून जंगलातील एक गुप्तवाट पकडली आणि त्या निर्बीड अरण्यातील वाटेने ते रस्ता कापू लागले.

बराच वेळ गेला आणि वस्तादकाकांनी मौन सोडल सखारामला प्रश्न केला…..

सखाराम…..हि चांदीची पेटी आणि परवलीचा शब्द तुम्हाला कोणी दिला?

आकस्मित प्रश्नाने सखाराम भानावर आला…

जी..जी..सखारामला शब्द फुटेना..

जी.जी..काय असेल ते खरे सांगा ….

तुम्हाला काही वाटत नसेल या गोष्टीये पण,ज्या गोष्टीमुळे स्वराज्याच्या
हेरखात्याची झोप उडाली. अन्न पाणी गोड लागेना तोच विषय आज पुन्हा समोर
येतोय ..माझी विचार करून करून बुद्धी गंजून गेली आहे..

कोणी दिली चांदीची पेटी सांगा.नाहीतर तुम्हाला कैद करवून वदवून घ्यायची
कला पण आहे आमच्याकडे…..

कैदेची भाषा ऐकताय सखाराम बोलू लागला….

धनगरवाडी-नरभक्षक वाघ-टकमक टोक…आणि वाघांच्या तावडीतून सुटका
केलेला खंडोजी कसा भेटला हे सांगताच वस्ताद काका औरडले

काय?

खंडोजी भेटला?

मूर्ख आहात काय तुम्ही?

का मला वेडा समजत आहात?

खंडोजी या जगात नाही, तो मेलेला आहे.मेलेली माणसे कशी भेटतील तुम्हाला?

हे काकांचे शब्द ऐकताच सखाराम आणि त्याच्या साथीदारांनी डोळेच पांढरे केले.त्यांची पायावर धारण बसली.

सखारामने मग झालेला सर्व वृंतांत सविस्तरपणे कथन करायला सुरुवात केली.वाघांच्या तावडीतून केलेली सुटका…सावित्री आणि राजे शिर्के यांची भेट..खंडोजीच्या तोंडून ऐकलेली बाजिंद ची कथा….

हे सर्व ऐकल्यानंतर वस्तादकाका मटकन खाली बसले.

अरे हे कसे शक्य आहे?

खंडोजी तर या जगात नाही..

मेलाय तो..मारलाय त्याला!

बाजींदचा पुढील भाग ३५ पाहण्यासाठी येथे क्लीक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!