बाजींद भाग ३६

काळभैरवाच्या नांवान चांगभलं…….

तलवारीचे घाव एकमेकावर पडू लागले…!

मराठे विरुद्ध मराठे लढू लागले.

हेच शिवाजी महाराजांना नको होते म्हणून कित्येक वर्षे यशवंतमाचीकडे
महाराजांचे दुर्लक्ष होते.
पण,परकीय शत्रूपेक्षा स्वकीय शत्रूच जास्त घातक हा अनुभव महाराज सारया
आयुष्यभर घेत आले होते.
आता निर्वाणीचा क्षण होता.रामराज्य आणायचे असेल तर रावण स्वकीय आहे
म्हणून गप्प बसता कामा नये.
आज शिर्के विरुद्ध मावळे घनघोर युद्धास प्रारंभ झाला होता.

खुद बहिर्जी नाईक या युध्दात होते.

कसे काय देव जाणे…आजवर बहिर्जी नाईक प्रत्यक्ष युद्धात फार कमी येत असत.

व्यवस्थित पूर्वनियोजन करून देत सारे तेच करत असायचे मात्र हातात तलवार
घेऊन लढणे सहसा दिसत नव्हते…!
नाईकांच्या युद्धनीतीने मराठ्यांची सेना शिक्यांच्या विरोधात लढत होती.

यशवंतमाचीशी वैर करून त्यांच्याच विरोधात भीमा जाधवही लढत होता.
पण,या सार्या दंग्यात खंडोजी कुठे होता ?
तो तर सर्वात पुढे येऊन लढायला हवा होता. आतातर यशवंतमाधीचा जावई होता
तो….

पण,खंडोजी कुठेच दिसत नव्हता……

पण त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ होता….

जीवघेण्या लढाईला प्रारंभ झाला.

भीमा जाधवाने शिर्क्यांचा संहार मांडला होता.त्याच्या तलवारीच्या घावाखाली
कित्येक शिर्के मंडळी मृत्युमुखी पडू लागली.
भीमाच्या भोवती अनेक शिर्क्यांनी कडे केले होते…तरीही भीमा मागे हटत
नव्हता…मारामारीत भीमा चांगलाच दूर गेला…दिसेनासा झाला..तरीही तलवारीचे
खणखणाट ऐकू येतच होता.
बहिर्जी नाईकांनी यशवंतमाचीच्या राजवाड्यावर हल्ला चढवला..काही क्षण

भूतकाळात जमा झाले आणि माचीवर हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा फडकू
लागला…

झाले…..अनेक वर्षे गुर्मीत राहून महाराजांशी अभिमानाने वैर मिरवणारी
यशवंतमाची हिंदवी स्वराज्यात सामील झाली.

राजवाड्यात मात्र राजे येसाजीराव शिर्के,त्यांचा कुटुंबकबीला जाग्यावर
नव्हताच….कदाचित युद्धाच्या घोषणा झाल्या त्यावेळी गुप्तवाटेने ते पसार झाले
असावेत असे वाटते…पण माची स्वराज्यात सामील झाली.

एक मात्र घटना खूप वाईट तितकीच चांगलीही घडली.
खंडोजी मराठ्यांच्या हाती जिवंत गवसला.

खुद्द बहिर्जी नाईकांनी त्याला चोरवाटेने पळून जाताना पकडले होते.

तोंडावर काळे अवलान बांधून त्याला हात बांधून धक्के मारत त्यांनी सर्वासमोर
आणले….!

यशवंतमाची हिंदवी स्वराज्यात सामील झाल्याचे वृत्त रायगडावर रवाना झाले.

माचीच्या रक्षणाला मराठी फौज ठेवत नाईक आणि वस्ताद काका खंडोजीला
घेऊन रायगडावर आले होते…!

कोणत्या तोंडाने सांगावे महाराजांना खंडोजी सारख्या निष्ठावान हेराची गद्दारी..!

महाराजांना अश्या गोष्टी न सांगणेच हितकारक असते…

खंडोजीने कर्तव्यात कसूर करुन,एका स्त्री च्या मोहमायेत अडकून आपल्याच
बांधवाना कित्येकदा धोक्यात आणले व त्यांच्याविरुद्ध शस्त्र चालवले,त्याच्या या
वागण्याने मराठ्यांच्या गुप्त मोहिमेला आणि हेरखात्याच्या नियमांना तडा
गेला. कित्येक मराठे मृत्युमुखी पडले, कित्येक बायका विधवा झाल्या.

असा ठपका त्याच्यावर ठेवला गेला आणि ….

साऱ्या रायगडच्या काळजात धस्स झाले अशी शिक्षा बहिर्जी नाईकांनी फर्मावली.

कडेलोट..!

होय! अशा फितुरांना स्वराज्यात एकच शासन..मृत्यूदंड

बाजींडचा पुढील भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!