बाजींद भाग ४९

स्वराज्याची राजधानी म्हणून आम्ही रायगड निवडला,पण त्या राजधानीच्या अस्तीनीतील निखारे तुमच्या मुळे बाजूला झाले…आता आमच्या डोक्यात केवळ दक्षिण-दिग्विजय आहे…!

राजे सावित्रीकडे पाहत बोलले…..सावित्री..तुझ्यासारख्या मुली ही खरी स्वराज्याची दोलत आहे.

चुलीपुढे काम करणारे हात स्वातंत्र्यासाठी रणांगण गाजवू शकतात हे तुझ्या कृतीने तू दाखवून दिल्रेस…खंडोजी,तू मोठा भाग्यवान आहेस ,तुला सावित्री सारखी पत्नी मिळत आहे..खंडोजी मान खाली घालून केवळ ऐकत होता…!

आणि बाजिंद.

राजांच्या आवाजाने बाजिंद ने पुन्हा मुजरा केला.
राजे बोलू लागले.

महाराष्ट्र ही बुद्धिवंतांची जननी,पण बुद्धी बरोबर कर्तव्य, स्वाभिमान, संस्कृतीची जपणूक करणारे तुमच्यासारखे वीर आम्हाला भेटले नसते,तर असे हजारो शिवाजी मिळूनही महाराष्ट्र स्वतंत्र झाला नसता…!

यावर बाजिंद बोलु लागला.

राजे…..असे बोलून मला लाजवू नये…..१०० वर्षे आम्ही आमच्या मूळ पुरुषाचा हा अनमोल ठेवा जणू काही तुमची वाट बघत जपला होता…आता आम्हाला मरण जरी आले तरी आम्ही तयार आहोत.

हिंदवी स्वराज्याचे हे पवित्र कार्य,आसेतु हिमाचल असेच सुरु राहील यासाठी आम्ही सारेच जीवाची बाजी लाव……!

राजे हसले…..आपण सारेच जीवाची बाजी लावून काम करुया…!

जगायचे तर स्वताच्या भूमीत,स्वतंत्र भूमीत..नाहीतर लढता लढता मरण
पत्करायचे.

वस्ताद काकाकडे पाहत राजे बोलले.

काका…आम्हास माफ करा,हा सारा खेळ तुमच्या उपरोक्ष आम्ही अमलात आणला.

कारण कमी वेळेत खूप काही साधायचे होते….सर्वाना सांगत बसलो असतो तर अजून १० वर्षे रायगड मध्ये देवा धर्माचे राज्य आणणे अवघड होते.

जे विरोध करत होते,ते आपलेच लोक होते..त्यामुळे हि नीती आम्हाला अमलात आणावी लागली….चला…निघतो आम्ही …पुढची तयारी काय असेल..हा यशवंता तुम्हाला सांगेल….जातो आम्ही..!

आणि आल्यापावली राजे घोड्यावर स्वार झाले आणि रायगडाच्या वाटेला निघून गेले..मागोमाग महाराजांची शिवगंगा दोडत निघाली….!

सारेच थक्क झाले होते राजांच्या बोलण्याने. सखाराम ने वस्ताद काकांना खून करत बोलला.

काका…आमच्यासोबत जे चार दिवस खंडोजी बनून आले होते….ते हेच ..!

यशवंताकडे पाहत सखाराम बोलत होता,आणि यशवंता हसत हसत सर्वांच्या जवळ आला आणि सखाराम ला बोलला….

काय सखाराम….तुमच काम झालं म्हण…?

मजी महाराज म्हणत व्हत..की अतापास्न टकमकावर्ण एकबी हरामखोर टाकणार नाय…?

बेस झाल बगा तुमच…

आता मात्र सखाराम ला हुंदका आवरणे अशक्य झाले….त्याने रडतच यशवंता च्या पायाला मिठी मारली आणि बोलू लागला.

मला कायबी समजना..कोण आहे तुमी…आमच्या गरीब लोकांना देव म्हणून भेटलासा…तवा खंडोजी…आणि आता यशवंता …खर कोण हायसा तुम्ही ते तर बाजूला उभा असलेला खंडोजी हासतच बोलला.
सखाराम….हे …हेच आहेत आमचे बहिर्जी नाईक…!

हिंदवी स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख.

बाजींदचा शेवटचा म्हणजे भाग ५० पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

1 thought on “बाजींद भाग ४९”

  1. डॉ ़भाग्यक्षी विवेक पाटील

    अतिशय उत्कृष्ट लेखनशैली, वाचनाची ओठ निर्माण करणारी, रहस्यमय, सुरेख ़
    जय भवानी जय शिवाजी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!