धना भाग १६

”धना”

भाग १६ वा…!

पाटलांच्या आणि गावकर्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला होता.
आपल्या गावात येऊन प्रत्यक्ष पाटलांची मुलगी पळवली जाते ,तर मग सर्वसामान्यांच्या आयाबाहीनीने कुणाकडे पहावे ?
सर्व गाव पाटलांच्या वाड्यासमोर गोळा झाला होता ,पाटील,वस्ताद आणि मातब्बर मंडळी घण चर्चेत व्यस्त होती.
हा प्रश्न आता केवळ पाटलांचा उरला नव्हता.


गावात सकाळपासूनच पोलीस गाड्यांचे येणे जाणे सुरु होते.
धनाच्या जाण्याने गावात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली होती ,सूर्याजीने गावाच्या अब्रूसाठी गावचे प्रतिनिधित्व केले होते,मैदानात घडलेला तो आकस्मित प्रकार आणि सूर्याजीने धनाबाबत केलेला खुलासा ….आणि आता तर प्रत्यक्ष पाटलांची मुलगी गायब ..!
मोठमोठ्या मुत्सद्दी माणसांची डोके सुन्न व्हावीत असा हा प्रकार.


वस्ताद ,पाटील आणि गावातील प्रमुख मंडळी या विचारात व्यस्त होती कि राजलक्ष्मी ला कोणी पळवले असावे ?
जर सूर्याजीराव खर बोलत असतील कि बिल्लाच्या जागी धना होता ..तर नक्कीच धनाने मुलगी पळवली असावी का ?
जर असेल तर काय कारण असावे ?
कारण पाटील तर स्वताहून तिचा हात त्याच्या हाती देणार होते.
जर दुसर्या कोणी पळवली असेल तर पाटलांचे कोणाबरोबर काय वैर असावे ?
खरोखर डोके जड झाले होते.

इकडे किल्ल्यावर राजे यशवंतराव आपल्या अंगरक्षकासह परत आले होते,काल बिल्ला चा खात्मा झाल्याची खबर त्याना देण्यात आली आणि याचसह रात्री उशिरा धनाच्या गावात राजलक्ष्मी पाटलांच्या वाड्यात नव्हती,हेरांकडून अशी बातमी कळली आहे कि आपल्या आधीच २-३ जणांनी तिला पळवली.
गावात पोलिसांचा राबता वाढला आहे ,गावकरी संतप्त आहेत.


राजलक्ष्मी पळवल्याचे खापर धनावर येणार आहे अशीही चिन्हे आहेत..!
जर असे घडले तर संघटनेची गुप्तता उघड होण्यास आणखी वाव मिळणार होता.
राजे शांतपणे सार्या खबरा ऐकत होते.


मनात गणित मांडत होते ,या सर्व घडामोडीत धना किल्ला सोडून कुठेही गेला नव्हता याचे राहून राहून त्याना मोठे आश्चर्य आणि अभिमान वाटत होता.
राजानी धनाला बोलावून आणण्याचे आदेश दिले..!

इकडे राजलक्ष्मी ला मोठा प्रश्न पडला होता आणि भीतीने शरीर थरथर कापत होते.
तिने सूर्याजीला प्रश्न केला …मी कुठे आहे ?
मला इथे का आणले तुम्ही ?
सूर्याजीराव शांतपणे हातातील चहाचा कप बाजूला ठेवत म्हणाले..!
”राजलक्ष्मी” मला माफ कर तुला मला जबरदस्तीने इथे आणावे लागले.
पण हे करण्यामागे माझा फार मोठा हेतू होता.
जर काल तुला मी इथे आणले नसते ..तर आजचा दिवस बघायाला तू जिवंत नसतीस ..!
काय ..?
मी जिवंत नसते ?
कोणी मारले असते मला ?…आणि त्याचे कारण काय ?


सूर्याजी शांतपणे म्हणाला …तुला सर्व सांगतो आधी तू शांत हो ….!
असे म्हणत चहाचा कप तिच्या हातात देत म्हणाला ..राजलक्ष्मी विश्वास ठेव, मला स्वताला खूप मोठा धक्का बसत आहे जेव्हा हे सारे मला समजले तेव्हा.
कदाचित तुला ते पटेल किंवा न पटेल पण या ७ दिवसात मी सुट्टी घेऊन गावी जातो अशी अफवा केली आणि सार्या गोष्टी मला उलघडल्या ..तुला आठवते मी शपथ घेतली होती कि धना इस्पितळातून का गेला आणि बिल्ला बनून का लढला ..हे सारे गूढ मला समजले आहे ….तू चहा घे सर्व सांगतो …!


सुर्याजीच्या या बोलण्याने राजलक्ष्मी भानावर आली ,पण हे रहस्य तर धनाने तिला घरी येऊन भेटून सांगितले होते ..पण तिला कोण जीव मारणार होते हे मात्र गूढ तिला उमगले नव्हते ….ती पटकन म्हणाली ..माझा जीव कोण घेणार होते हे तर सांगा ….!
सूर्याजी पटकन उत्तरला …..तुझा जीव घेणारे धनाचे साथीदार आहेत दुसरे कोणी नाही …!


हे ऐकून राजलक्ष्मी चे डोळे विस्फारले गेले….तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले.
सूर्याजी खिडकीतून येणार्या गार वार्याच्या झुळूकेत हात पाठी मागे बांधून उभा राहिला..आणि बाहेर पाहत मोठ्या निर्धाराने बोलू लागला..!

धनाने मला कुस्तीत चीतपट केले ,बिथरलेल्या हत्तीसोबत साठमारी खेळत तो हत्तीच्या मागे गेला हे माझ्या डोक्यात बसले होते.
मी पराभूत झालो याचे दुख नव्हते मला ,पण धना ने असे का करावे हा प्रश्न मला पडला होता.


मी पाटलांच्या घरी त्यांच्या कानावर हे घातले कि धना च बिल्ला होता ,पण त्याना हे पटले नसावे …!
माझी झोप उडाली होती या प्रकरणाने.
नशिबाने या प्रकरणाची ची सर्व सूत्रे वन खात्याने माझ्या हाती सपुर्द केली.


मी शारीरिक अस्वस्थता दाखवत ७ दिवसांची रजा काढली आणि गावी जाऊन येतो म्हणून निघालो..!
माझ्या खोलीत येऊन मी विचार करू लागलो कि धना पर्यंत कसे पोहचावे.


एकदम वीज चमकली..साठमारी..!
साठमारी म्हणजे हत्तीसोबत झुंझ देणे आणि त्याला पराभूत करणे.
हे गूढ ज्ञान हल्ली लुप्त झाले आहे.पण ज्यावेळी मी नागपूर येथे वन भवन या वन खात्याच्या मुख्यालयात प्रशिक्षण घेत होतो तेव्हा कोल्हापूर ची एक वयोवृध्द व्यक्ती आम्हाला एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आल्याचे आठवले.


त्यांचे नाव जयकर शेलार मामा..!
शेलार मामा हे जुने जाणते पैलवान आणि जगात एकमेव अशी व्यक्ती जी केवळ बहुबल आणि युक्तीचा वापर करून सर्व हिंस्त्र वन्य प्राण्याला ताब्यात आणू शकत होती.
त्यांचे भाषण आमच्या उच्च अधिकार्यांनी ठेवले होते.
हिंदी आणि मराठी मिश्रित त्यांचे उच्चार आजही माझ्या कानात ऐकू येत होते.


त्यानी हत्ती साठीमारी खेळ खेळून हत्ती कसा कब्जात आणावा हे इतक्या सुंदर पद्धतीने सांगितले कि मी तर त्यांचा भक्त झालो.
मला आठवते कि अकस्मात हत्ती पुढे आला तर कोलांटी मारून त्याच्या पायातून मागे कसे जावे हे त्यांनी सांगितले होते ..आणि ….नेमके तेच धनाने कुस्ती संपल्यावर बिथरलेल्या हत्ती सोबत साठीमारी खेळ खेळून केले.
माझ्या मनात खूप प्रश्न आले …धना आणि शेलार मामा यांचा काहीतरी संबध असावा का ?


म्हणून मी त्वरित नागपूर मुख्यालयात ट्रंक कॉल बुक करून सर्व माहिती घेतली.
आणि समजले कि शेलार मामा सध्या कोल्हापुरातच वास्तव्यास आहेत.


मी माझी सर्विस रिव्होल्व्हर घेतली आणि वन खात्याने दिलेल्या मोटारीतून दिलेया पत्त्यावर जाऊ लागलो.
जोतीबा डोंगराच्या उजव्या अंगाला असलेल्या घनदाट जंगलात त्यांचे मर्दानी खेळ शिकवण्याचे केंद्र होते.कलेक्टर,पोलीस प्रमुख,मंत्री यासह सर्वसामान्य जनता देखील हक्काने शेलार मामांच्या केंद्राला भेट देत असे
मी केंद्रात गेलो आणि मामा हातात दांडपट्टा घेऊन काही मुले आणि मुलीना पट्ट्याचे हात शिकवत होते..!


माझी मोटार बाजूला उभी करून मी आत जाऊ लागताच दोन मोठी शिकारी कुत्री माझ्यावर भुंकू लागली …हे पाहताच मी रिव्होल्व्हर काढले आणि हवेत बार काढणार इतक्यात शेलार मामा नि जोरात हाक मारली ….वाघ्या….मोत्या ..!
मामांचा भारदस्त आवाज ऐकून कुत्री मागे सरकत आत निघून गेली..!
मामा स्वता माझ्यासमोर आले आणि मी कोण विचारले ?


मी रिव्होल्व्हर आत ठेवली आणि मामांच्या पायांचा आशीर्वाद घेतला आणि म्हणालो …मामा मी सूर्याजी ..इथे वन खात्यात अधिकारी आहे..!


मी तुमचे भाषण ३-४ वर्षामागे नागपुरात ऐकले होते आमच्या मुख्यालयात ..काही काम होते म्हणून मी आलो आहे ..!
मला पाहताच मामा नी ओळखले …सूर्याजीराव तुम्हाला ओळखतो मी.
परवाची खासबागेतील कुस्ती पहायला आलो होतो मी ..या या आत या .!
असे म्हणत मामानी केंद्रातील नोकरांना खुर्च्या टाकायची आज्ञा केली.
चहापान झाले आणि मी मूळ मुद्द्याला हात घातला,


मामा मला साठमारी विषयी माहिती हवी ..तुम्ही पाहिलेच कि परवा जो हत्ती मारला गेला तो बिल्ला च्या साथीदारांनी मारला आहे.
पण त्याच्या आधी तो बिल्ला त्या हत्तीसोबत साठमारी खेळला..मी जर मध्ये पडलो नसतो तर त्याने नक्कीच हत्तीला आवरले असते ..पण मी हत्तीला पुन्हा डिवचले आणि हत्ती बिल्ला वर हमला करायला गेला आणि बिल्ला च्या दरोडेखोर साथीदारांनी बंदुकीने हत्ती मारला..!


मला चांगले माहित आहे कि हिंदुस्थानात केवळ तुम्ही एकमेव असे आहात कि ज्याना साठमारी कला अवगत आहे ….मामा मी विनंती करतो मला एवढे सांगा कि तुमच्या कडून हि कला आणखी कोणाला शिकवली गेली आहे का ???


काहीक्षण मामानी सर्व ऐकून घेतले आणि निर्धारी आवाजात म्हणाले ..सूर्याजीराव साठमारी हि अद्भुत कला आहे ..प्राण्यांच्या सोबत बाहुबलाने खेळण्याची ज्यांची छाती आहे अशाच लोकांना ती अवगत होते.
केवळ कुत्र्याला पाहून पिस्तुलीला हात घालणारे आजचे तुमच्या माझ्या सारखे लोक हि कला काय आत्मसात करणार ?


जसे अधिकारी होण्यासाठी म्याट्रिक परीक्षा पास करावी लागते तसे साठमारी शिकायला वाघ,सिंह यांच्याशी चार हात करून जिवंत परतावे लागते..आणि आजच्या जमान्यात असे जीवघेणे धाडस कोण करेल …आणि राहिला प्रश्न मी शिकवण्याचा ..हल्ली पोरांना पिस्तुल,बंदुकी हे शिकायला आवडते …साठमारी जरी शिकली तरी हत्ती कुठे आहेत आजकाल ..!


माफ करा ..पण हे ज्ञान मी कोनालाच शिकवू शकत नाही कारण शिकणारा एकही व्यक्ती माझ्यापर्यंत आला नाही ..!
मोठा श्वास घेत मी म्हणालो ..ठीक आहे मामा ..!
मला माफ करा मी विनाकारण हे प्रकरण घेऊन तुमच्यापर्यंत आलो.


पण मी तर काय करणार ..प्रशासन माझ्यावर दबाव आणत आहे ..या प्रकरणाचा छडा लागल्याशिवाय मला पर्याय नाही..!
असे म्हणत मी उठलो ….तितक्यात पलीकडच्या डोंगरातून २-३ घोडेस्वार आले ,पायउतार होवून मामांच्या पाया पडले आणि माझ्या नजरेला भिडलेली नजर मामान्च्याकडे वळवत म्हणाले ..मामा ”सर्वाना अक्षता पोहोच झाल्या आहेत ,लग्नाची तारीख ठरवायला वरबाप भेटायला यायचे म्हणतात “
यावर मामा म्हणाले …ठीक आहे या म्हणाव सवडीने …पण अमोश्याला येणे करा ,पुनिव सोडून या म्हणाव …!
मामांच्या या उत्तराने ते घोडेस्वार पुन्हा घोड्यावर स्वार झाले …मीही मामांचा निरोप घेऊन पुन्हा माझ्या खोलीत आलो..!
माझ्या डोक्यातून तरीही साठमारी चा विचार जाईना आणि मला अचानक ते घोडेस्वार मुलीच्या लग्नाची बातमी सांगायला आलेले शब्द आठवले …
‘सर्वाना अक्षता पोहोच झाल्या आहेत ,लग्नाची तारीख ठरवायला वरबाप भेटायला यायचे म्हणतात “…मी विचारात पडलो …आम्हाला प्रशिक्षणात एक विषय होता कि जंगलात धुमाकूळ घालणारे नक्षलवादी सामान्य जीवनात निरोप देण्या घेण्या करता अश्याच गूढ शब्दांचा वापर करतात …माझे डोके आणखी सुन्न झाले ……आणि मी त्या शब्दांचा अर्थ काढायला बसलो आणि मामांचे उत्तर हि आठवले .”पण अमोश्याला येणे करा ,पुनिव सोडून या म्हणाव …!”
२-३ तास विचार करून मला उत्तर सापडले कि काहीतरी मोठ्या कारस्थानाची तयारी झाली आहे आणि मामाना भेटायला त्यांचा मुखिया येणार आहे ..आणि मामा म्हणत आहेत कि दिवसा उजेडी नको दाट अंधार्या रात्री या …!
माझ्या मनात आलेल्या शंकेने पुन्हा घर केले आणि मी पुन्हा माझी रीवोलव्हर घेतली आणि काळा पोशाख परिधान करत मामांच्या केंद्राच्या आसपास दबा धरून बसलो ……एव्हाना मध्यरात्र होत आली..!
अंधार्या रात्रीत घोड्यांच्या टापा ऐकू आल्या …साधारण ५०/६० माणसे असावीत..!
घोडे डोंगरावर बांधून त्या सावल्या मामांच्या केंद्राकडे निघाल्या ..आणि केंद्राचे दार उघडून आत गेल्या …मी मोठ्या सावध तेने केंद्राच्या मागे असलेल्या भिंतीवर चढून आत प्रवेश केला..!
मामा मोठ्या पलंगावर बसले होते आणि शेजारी तो धिप्पाड म्होरक्या ज्याचे केस पांढरे होते मात्र अंगापिंडाने मजबूत होता …..तो बोलत होता..!


मामा,वास्तदाच्या धनान मोठा घोळ केला आहे.संघटनेचे रहस्य पाटलांच्या पोरीला सांगून बसला आहे ,परवाच्या कुस्ती मैदानात हत्ती मेला त्याचा तपास केंद्राकडे गेला आहे..!
काय करावे सुचेना ..कधी नव्हे ते मोठे संकट आले आहे ..!


मामा शांतपणे म्हणाले …..यशवंत तुझे बरोबर आहे …..आज तो वन अधिकारी सूर्याजी आला होता ,साठमारी विषयी चौकशी करत होता..!
आपण धनाला साठमारी शिकवली होती,हे त्याच्यापर्यंत जायला वेळ नाही लागायचा…


तपास जोरात सुरु झाला आहे याचे हे संकेत आहे …!
मग काय करावे म्हणता मामा ?
तो गृहस्थ बोलला ..!
आता एकच पर्याय…भावना बाजूला ठेवून सर्वांनी पसार व्हावे.
हिंदुथानात सर्वत्र पसरून किमान २ वर्षे राहावे ,त्याची सोय मी करतो.


तुम्ही सर्वाना आदेश द्या ,कि निघायचे आहे….आणखी एक पाटलांची पोरगी आणि वनअधिकारी सूर्याजीराव आणि तो बिल्ला या तिघांना नाईलाजाने संपवावे लागणार ..कारण जर हे जगले तर आज ना उद्या संघटन संपणार ..आणि देशभक्तीचा हा ५० वर्षाचा यज्ञकुंड विझणार ..हजारो जणांनी केलेले बलिदान व्यर्थ जाणार ..वास्तदांचे स्वप्न अपुरेच राहणार ..!


नाही नाही….प्रसंगी प्राणांच्या बाज्या लावाव्या लागल्या तरी बेहत्तर ..पण हे होणे नाही ..तो गृहस्थ उद्गारला …..!
उद्या संध्याकाळ पर्यंत सर्व जन मरतील मामा …धना आपला राजा आहे ,त्याला हे दुख गीळावेच लागणार..!
आणि ते सारे पुन्हा डोंगरमार्गे निघून गेले…..मीही मागोमाग गेलो.


पण ते घोड्यावरून आणि मी पायी जास्त पाठलाग नाही झाला ..पण विशाळगड वाटेला मध्येच कुठेतरी दाट जंगलात आणि डोंगर दरीत त्यांचा मोठा अड्डा असण्याची शक्यता आहे ….!
धना सुध्दा तिथेच सापडेल ……!

सूर्याजी हे सर्व सांगत असताना राजलक्ष्मी एकाग्रतेने सर्व ऐकत होती आणि हुंदके देत रडत होती…!
सूर्याजी थांबला आणि पुन्हा बोलला ..राजलक्षमी तुला मी इथे आणले कारण काल रात्रीच तुला मारण्याचा बेत होता …आणि दुसरी गोष्ट ….जर धनाने तुला संघटनेचे रहस्य सांगितले आहे …तर तू का अजून गप्प ?
का माझ्या आयुष्यात आलीस तू ?
५ वर्षाचे दुख मोठ्या दिलाने गिळून मी जगत होतो ,का आला तुम्ही सारे माझ्या आयुष्यात …सोडलेला लंगोट मी पुन्हा लावला ..तुझ्या रूपाने मी भूतकाळ शोधू लागलो आणि ….तुम्ही सार्यांनी मिळून माझ्या आयुष्याचा खेळ केलात..!
मला जगायला पण अवघड केले तुम्ही …सांग राजलक्ष्मी तुझ्यावर प्रेम करून मी गुन्हा केला ?
तुझ्या गावाच्या इज्जतीसाठी..धनासाठी मी सरकारी नोकर असून कुस्ती खेळायला तयार झालो…काय हा माझा गुन्हा ?
धनाने बिल्ला बनून मला चीत केले ते कश्यासाठी ?
सांग माझा काय गुन्हा असे म्हणत ..सूर्याजीला हुंदके अनावर झाले..तो धाय मोकलून रडू लागला ….!
तितक्यात त्या खोलीखालुन डोंगर रस्त्याने किमान हजारभर सशस्त्र जवान सुर्याजिच्या सांगण्यावरून आले होते ….!
बस्स ..आता गप्प नाही बसणार मी.
राजलक्ष्मी धना आणि तुझी भेट घडवून आणणे हे माझ्या आयुष्याचे आता ध्येय आहे ….आणि त्या स्वताला देशभक्त समजणार्या आणि त्या आडून हजारो गुन्हे करणार्या संघटनेचा अंत केल्याशिवाय आता सूर्याजी स्वस्थ बसणार नाही ..!

डोळ्यात आलेले पाणी पुसत सूर्याजी राजलक्ष्मी कडे पाहत म्हणाला ..राजलक्ष्मी तुझी आणि धनाची भेट आता मी करून देणार तयार हो..आता निघायचे आहे..!
असे म्हणत सूर्याजी खोलीबाहेर आला..!


भारतीय वन खात्याचे सशस्त्र हजार जवान आणि त्यावरील १० प्रमुख अधिकारी धनापुढे आले आणि सलाम करत पुढे झाले..!
ते १० जवान आणि सूर्याजी एका टेबलाभोवती उभे राहिले ..त्यातील एकाने मोठा नकाशा काढून टेबलावर ठेवला …सूर्याजी त्या नकाशावर बोट ठेवत पुटपुटु लागला ..हे कोल्हापूर..हे शेलार मामांचे केंद्र…हा पन्हाळा..ज्योतिबा…आणि हा विशाळगड ……आणि एका ठिकाणावर बोट ठेवत म्हणाला…….हेच ते ठिकाण गड्यांनो…जिथे आपल्याला जायचे केंद्र सरकार कडून आदेश आहेत ….!


विशालगड आणि पन्हाळा या जुन्या जंगली मार्गाच्या उगवतीच्या बाजूला एक नैसर्गिक जंगलाची दाटी नकाशात दिसत होती ..त्यावरच सुर्याजीचे बोट होते…!
त्यावर एक जवान उदगारला ?
पण सर जायचे तरी कुठे ?
आणि कोणाला पकड़ायला ?
आणि एवढे हजार जवानांची तुकड़ी कशाला त्यासाठी ?
महायुध्द होणार आहे काय ?
यावर सुर्याजी हसत म्हणाला याची उत्तरे मोहीम पूर्ण झाल्यावर सांगेन ..आत्ताच कोणी शंका वीचारु नका,पण ही मोहीम महायुध्दापेक्षा कमी नाही याचेही भान ठेवा..!

पुढील भाग पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

1 thought on “धना भाग १६”

  1. Pingback: धना भाग १५ —

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!