जय शिवराय,
आपल्याला अनेकवेळा प्रश्न पडतो की आपले राजे शिवछत्रपती दिसायला कसे होते?तसेच त्यांचे हस्ताक्षर कसे होते?
त्याकाळी दुर्देवाने कॅमेरा, मोबाईल आणि आजच्या सारखे उपकरणे उपलब्ध नव्हते.त्यामुळे राजांचा जसाच्या तसा फोटो उपलब्ध नाही.त्यामुळे निश्चितच चित्रकाराने काढलेले व्यक्तीचे चित्र काढून मिळायचे.
मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का, १९३३ पूर्वी महाराष्ट्रामध्ये ज्या फोटोला लोक आपले दैवत समजायचे, छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे. तो फोटो एका मुस्लिम सरदाराचा म्हणजेच इब्राहिमखान याचा फोटो होता
.हे खूप धक्कादायक होते.परंतु
जेव्हा आपले इतिहास संशोधक वासुदेव सीताराम बेंद्रे जेव्हा लंडनला गेले होते तेव्हा त्यांना एक चित्र मिळाले.ते तुम्ही खाली पाहू शकता.

आता या चित्र शिवरायांचे आहे हे कशावरून..तर शिवमित्रानो,जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज सुरतेवर छापा घालण्यासाठी (१६६३-६४) गेले होते त्यावेळी ते डच गव्हर्नरच्या भेटीसाठी गेले होते
.त्यावेळी त्या छावणीत व्हॅलेंन्टीन नावाचा गर्व्हर्नर होता.या डच लोकांना एक चांगली सवय होती ती म्हणजे कुणीही मोठी व्यक्ती त्यांच्या भेटीसाठी गेले की त्याचे चित्र काढायचे.आणि सुदैवाने त्यांनी आपल्या शिवाजी महाराजांचे हे चित्र काढले.
बेंद्रे जेव्हा इतिहास संशोधन करण्यासाठी लंडनमध्ये गेले तेव्हा त्यांना व्हॅलेंटाईन च्या पत्रात हे चित्र आढळले. या चित्रात महाराजांच्या अंगावर पांढऱ्या रंगाचे उपरणे आपण पाहू शकतो, तसेच इतर दागदागिने हे मराठी पध्दतीचे वाटतात.
बेंद्रे यांनी १९३३ मध्ये भारतात येऊन शिवजयंती च्या दिवशी हे चित्र प्रदर्शित केले.नाहीतर आपण त्या इब्राहिमखानालाच शिवाजी महाराज समजत असतो.
इब्राहिमखानाच्या कोणत्या फोटोला आपण शिवाजी महाराज समजत होतो तो पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आता शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर पाहुयात,
खालील मोडी लिपीचे शिवाजी महाराजांनी लिहलेले दान पत्रे आहेत. त्यामध्ये शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर आहे.

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे पुस्तक विनामूल्य वाचायचे असेल तर येथे क्लिक करा.
उत्तम कार्य!
Chatrapati Shivaji Maharajanca triwar jai jaikar
Jay Shivray 🚩🚩🚩🙏
Very nice
अप्रतिम माहिती
माहिती होते हे मला.. पण आपण आपल्या चॅनल चे माध्यमातून सर्वांना सांगितले ते फार बरे केले.
Pingback: १९३३ पूर्वी ज्या इब्राहिमखानाच्या फोटोला आपण छत्रपती शिवाजी महाराज समजत होतो ते चित्र. —
good work, keep it up, jai shivray, jai hind.
Thanks