नमस्कार शिवमित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या फोटोबद्दलचा इतिहास आपण या आगोदरच्या लेखात जाणून घेतला.आज आपण आपले दुसरे दैवत, स्वराज्याचे धाकले धनी-स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या खऱ्या फोटोबद्दल जाणून घेऊयात. संभाजी महाराज कसे दिसायचे तरर,
शिवमित्रांनो, त्याकाळी आजच्या सारखे मोबाईल, कॅमेरे वैगेरे नव्हते त्यामुळे व्यक्तीचे फोटो नसायचे, त्याकाळी व्यक्तीचे रेखाचित्र चित्रकाराद्वारे काढली जायचे?
छत्रपती संभाजी महाराजांचे सुदैवाने दोन चित्रे आपल्याला इतिहासाच्या ठेवीमध्ये आढळतात. त्यातील खलील हे एक चित्र संभाजी महाराजांचे अस्सल चित्र आहे.

१६८५ मध्ये गोवळकोंडा येथील अज्ञात चित्रकाराने काढलेले हे चित्र आहे. या चित्राचा शोध १९७८ साली जेरेमी लोस्टीनां यांनी लावला होता.छत्रपती संभाजी महाराजांचे हे समकालिन चित्र आहे.
संभाजी महाराजांचे उपलब्ध असलेले दुसरे चित्र हे खाली दिले आहे.हे चित्र आपल्या पैकी बऱ्याच जणांनी पाहिले नसेल.

हे चित्र १६९७ साली काढलेले आहे.म्हणजे संभाजी माहराजांच्या मृत्यूनंतर ८ वर्षांनी हे चित्र काढलेले आहे.या चित्रामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या मांडीवर युवराज शाहू राजे बसलेले दाखवले आहे.औरंगाबाद येथील बा.आ. मराठवाडा विद्यापीठ या संग्रहालयात हे चित्र आजपण आहे.
अण्णाजी दत्तो व इतर भ्रष्टी मंत्र्यांना हत्तीच्या पायी दिल्यानंतर छत्रपती संभाजीनमहाराजांनी नवीन मंत्रिमंडळात कुणाला स्थान दिले ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
मित्रांनो, १९३३ पूर्वी आपण एका मोगली सरदाराच्या छत्रपती शिवाजी महाराज म्हणत होतो.शिवाजी महाराजांचा खरा फोटो व त्या मोगली सरदाराचा फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
सर,हे फोटो छत्रपती शिवाजी महाराज यांचे मोठे बंधु असणारे संभाजी महाराज यांचे असतील असे वाटते.
मी आपल्याशी सहमत आहे.
पण शहाजी पुत्र संभाजी यांना अफजलखान यांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी
मारले आहे आणि हा फोटो 25 वर्ष पुढील वाटतो म्हणुन हा शिवाजी पुत्र संभाजी महाराज आहेत
Jra saral bola te chhatrapati ani Maharashtra che akhanda daivath ahet
शहाजी महाराजांच्या थोरल्या चुलत बंधूंचे नाव संभाजी होते पण ते चकमकीत मारले गेले त्याच्यावरून शहाजी महाराजांनी त्यांचे थोरल्या युवराजांच्या नाव संभाजी ठेवले …त्यानंतर त्यांना अफजल खानने मारले आणि त्यांची आठवण म्हणून शिवरायांच्या थोरल्या पुत्राचे म्हणजे आपल्याला माहीत असलेल्या संभाजी महाराजांचे नाव जिजाऊ मासहेबांनी संभाजी ठेवले ……आणि त्यांच्या मृत्यू नंतर रानु बाईंनी त्यांच्या मुलाचे नाव संभाजी ठेवले
नाही शहाजी पुत्र संभाजीराजे भोसले हे ३१ वर्षाचे होते तेंव्हा अफझलखान याने त्यांना दगा फटका करून मारले तेंव्हा शिवाजी महाराज २४ वर्षाचे होते ई.वी. सन १६५५ मध्ये
Rajmudra, khup molachi mahiti det aahat..khup subheccha
Hobsir.. Khupach molachibkamgiri karat aahe Rajmudra Group…
Pingback: छत्रपती संभाजी महाराजांचे हस्ताक्षर Handwriting of sambhaji maahraj —
Pingback: जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांचे उपलब्ध असलेली चित्रे —
बा. आ. मराठवाडा विद्यापीठ ऐवजी पूर्ण नाव लिहिले असते तर आपले काहीच नुकसान झाले नसते कारण महाराजांच्या बरोबरीचे नाहीत पण भारतीय समाजासाठी बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अमूल्य आहे. तुम्ही जरी अर्धवट लिहिलं तरी सर्वांना ते माहित आहेच. त्यामुळे कोणत्याही महान राष्ट्रीय व्यक्तीबद्दल असे वागणे बरे नव्हे. तुम्ही महाराजांची नवनवीन ऐतिहासिक माहिती देत असता म्हणून आपला आदर वाटतो पण आणि आपल्या कडून असे पुन्हा काही घडणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो.
जय शिवराय
Jra saral bola te chhatrapati ani Maharashtra che akhanda daivath ahet